World Chocolate Day 2024  esakal
देश

World Chocolate Day 2024 : जगातलं सर्वात महाग चॉकलेट किती रूपयाचं माहितीय का?

Expensive Chocolate : जगातलं सगळ्यात बेस्ट चॉकलेट खरेदी करायला तूमच्याजवळ कोट्यावधी रूपये पाहिजेत

सकाळ डिजिटल टीम

World Chocolate Day 2024 :

जगात खूप कमी लोक असतात आहेत ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. काही लोक तर चॉकलेटचे वेडे असतात. यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडत असं नाही तर ते मोठ्यांनाही तेवढच आवडत. पणआपण कुणालाही एक चॉकलेट देऊन खुश करू शकतो.

चॉकलेटची किंमत फार तर फार हजारो रूपयाच्या घरात असेल असा विचार आपण करतो. पण असं नाहीय. आपल्या विचारांच्या दुर दुर पर्यंत चॉकलेटची किंमत पोहोचली आहे. आज चॉकलेट डे आहे. त्यामुळेच आम्ही सर्व चॉकलेट प्रेमींसाठी काही अशी माहिती घेऊन आलो आहोत. जी ऐकून तूम्हीही चक्रावून जाल. (Chocolate Day 2023 : The most expensive chocolates in the world)

या चॉकलेटचा दर्जा नुसता बघूनच दिसतो. 'ले चॉकलेट बॉक्स' हे देखील खूप महाग चॉकलेट आहे. हा चॉकलेट बॉक्स चांगल्या डिझाइन केलेल्या बॉक्समध्ये येतो. त्यात हिऱ्याचे हार, बांगड्या आणि पन्ना आणि नीलमणी बनवलेल्या अंगठ्या आहेत. त्यातील चॉकलेट त्याच्या सॉफ्ट आणि स्पेशल चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या एका बॉक्सची किंमत सुमारे $1.5 दशलक्ष म्हणजेच 10.94 कोटी रुपये आहे.

जर तुम्ही जगातील सर्वोत्तम आणि अस्सल कोको चॉकलेट शोधत असाल, तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय असू शकतो. डेन्मार्कमधून आलेले निप्सचिल्ड चॉकोलेटियरचे चॉकलेट ट्रफल परिपूर्ण आहे. याची किंमत $2,600 म्हणजे 1,89,498 इतकी आहे.

फ्रोझन ह्योट या चॉकलेटला बनविण्याकरिता २८ दुर्लभ प्रकारच्या कोको, गोल्ड लीफ आणि La Madeleina Au Truffle वापरण्यात येतो. या चॉकलेटच्या कोपऱ्यांवर गोल्ड आणि डायमंड ब्रेसलेट लावल्या जातात. याची किंमत २५ हजार डॉलरच्या जवळपास आहे.

नोका चॉकलेट हे चॉकलेट एक कॅनडियन कंपनी बनवते. तसेच हे जगातील सर्वात महागडं चॉकलेट असल्याचे फोर्ब्स मॅगझिनमध्ये देखील नोंद झाली होती. या चॉकलेटची किंमत ३३० डॉलर म्हणजे तब्बल २४६०२.२१ रुपये आहे.

डेल्फी एडीबल गोल्ड क्रिएशन हे देखील महागडं चॉकेटल असून एका बॉक्समध्ये ८ चॉकलेट येतात. त्याची किंमत ही ३९७ डॉलर इतकी आहे. या बॉक्समध्ये स्वीस गोल्ड कॉईन देखील असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

Ambegaon Super 23 Initiative: आंबेगाव सुपर 23 उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा गौरवोद्गार

Asthma Day Warning: जागतिक दमा दिनानिमित्त तज्ज्ञांचा इशारा: वसई-विरार, मीरा रोड व मुंबईत वाढते श्वसन आजार

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

SCROLL FOR NEXT