Cigarette

 
Esakal
देश

Cigarette Prices Hike : आधी १० रुपयांना मिळणारी सिगारेट आता किती रुपयांना मिळणार?

Cigarette prices to rise: जाणून घ्या, सरकारच्या नवीन निर्णयामुळे सिगारेटच्या नवीन किंमती किती असतील?

Mayur Ratnaparkhe

Cigarette Prices to Increase After New Excise Duty : तुम्ही जर सिगारेट ओढत असाल तर आता तुम्हाला आता यापुढे सिगारेट खरेदी करण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहे. ही रक्कम केवळ सिगारेटच्या ब्रँडवरच नाही तर सिगारेटच्या लांबीवर देखील अवलंबून असणार आहे. कारण, केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०२६ पासून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर उत्पादन शुल्क जाहीर केले आहे. ज्यामुळे आता सिगारेटच्या किंमती वाढणार आहेत.

२०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर सिगारेटवरील हा सर्वाधिक कर आहे. सिगारेटवरील ४० टक्के जीएसटी व्यतिरिक्त उत्पादन शुल्क कर आकारला जाईल, जो सिगारेटच्या लांबीवरून आणि त्यात फिल्टर आहे की नाही यावर अवलंबून असेल. सिगारेट जितकी लांब असेल तितकी रक्कम जास्त असणार आहे.

या सरकारच्या निर्णयामुळे सिगारेटच्या किमती २० ते ५० टक्क्यांनी वाढू शकतात. लहान सिगारेटमध्ये २० टक्के वाढ होऊ शकते, मध्यम सिगारेटमध्ये ३० टक्के वाढ होऊ शकते. प्रीमियम सिगारेटमध्ये ५० टक्के वाढ होऊ शकते.

उत्पादन शुल्काच्या आधारे मोजले तर, फिल्टर न केलेल्या छोट्या सिगारेटची किंमत (६५ मिमी पर्यंत) २.०५ रुपयांनी वाढेल. फिल्टर केलेल्या छोट्या सिगारेटची किंमत (६५ मिमी पर्यंत) २.१० रुपयांनी वाढेल. ६५-७० मिमी दरम्यानच्या सिगारेटची किंमत ३ ते ४ रुपयांनी वाढेल. प्रीमियम सिगारेट (७०-७५ मिमी) सुमारे ५ रुपयांनी वाढू शकते.

तर, १० रुपयांच्या सिगारेटमध्ये २ रुपयांची वाढ होऊ शकते, ज्यामुळे ती १२ रुपयांना उपलब्ध होईल. १५ रुपयांची सिगारेट १८ किंवा १९ रुपयांना उपलब्ध होऊ शकते. २० रुपयांच्या सिगारेटची किंमत २३ ते २५ रुपयांना असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT