cinema hall cinema hall
देश

हरियाणा : सिनेमा हॉल १२ जानेवारीपर्यंत बंद; मल्टिप्लेक्स बंद ठेवण्याचे आदेश

हरियाणा प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू राहतील

सकाळ डिजिटल टीम

हरियाणा : कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता हरियाणा सरकारने आणखी सहा जिल्ह्यांतील सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि क्रीडा संकुल १२ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या नवीन जिल्ह्यांमध्ये निर्बंध लादले आहेत त्यात कर्नाल, पानिपत, कुरुक्षेत्र, यमुनानगर, रोहतक आणि झज्जर यांचा समावेश आहे. गुडगाव, फरिदाबाद, अंबाला, पंचकुला आणि सोनीपतमध्ये २ ते १२ जानेवारीपर्यंत निर्बंध आधीच लागू आहेत.

हरियाणा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या ताज्या आदेशानुसार, १२ जानेवारीला सकाळी ५ वाजेपर्यंत सर्व ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू राहतील. सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्स बंद राहतील; परंतु, मॉल्स आणि मार्केट सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून दूध आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. यापूर्वी पाच जिल्ह्यांमध्ये लागू केलेल्या निर्बंधांनुसार मॉल्स आणि बाजारपेठा बंद करण्याची वेळ सायंकाळी ५ वाजता होती.

सर्व क्रीडा संकुले, जलतरण तलाव आणि स्टेडियम बंद राहतील. परंतु, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी ते उघडता येतील, असे आदेशात म्हटले आहे. सर्व मनोरंजन पार्क आणि प्रदर्शनांवरील बंदी कायम राहील. सरकारी आणि खाजगी कार्यालयांना आपत्कालीन/अत्यावश्यक सेवा वगळता ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याचा सल्ला दिला आहे. १ जानेवारीचा आदेश आणि १२ जानेवारीपर्यंत लागू असणारे इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

कोविडच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ

हरियाणामध्ये एका आठवड्यात कोविडच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार बुधवारी राज्यात २,१७६ नवीन कोविड प्रकरणे नोंदवली गेली, तर मंगळवारी १,१३२. आकडेवारीनुसार बुधवारी नोंदवलेल्या २,१७६ प्रकरणांपैकी १,१७८ एकट्या गुडगावमधील आहेत. इतर अनेक जिल्ह्यांमध्येही प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

रात्री नाइट कर्फ्यू

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणासाठी पात्र असूनही अद्याप लसीकरण न केलेल्यांना १ जानेवारीपासून शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट आणि धान्य मार्केटमध्ये जाण्यास बंदी घातली होती. विशेष म्हणजे राज्यात रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लागू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT