DY Chandrachud esakal
देश

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

DY Chandrachud: बाल न्यायविषयक राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित करताना मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुलांमधील गुंतागुंतीचे नाते आणि जटिल सामाजिक व्यवस्था यावर प्रकाश टाकला.

Sandip Kapde

DY Chandrachud: नेपाळ सुप्रीम कोर्टाने नेपाळमध्ये आयोजित केलेल्या बालगुन्हेगारी आणि बाल न्यायविषयक राष्ट्रीय चर्चासत्रात CJI DY चंद्रचूड देखील सहभागी झाले होते. CJI न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले.

तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासाच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांशी संबंधित आंतरराष्ट्रीय डिजिटल गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून बाल न्याय प्रणालींना बळकट करणे आवश्यक असल्याचे डी वाय चंद्रचूड म्हणाले.

आर्थिक असमानता, घरगुती हिंसाचार आणि गरिबी यांसारख्या कारणांमुळे मुले अनेकदा गुन्हेगारी वर्तन करण्यास प्रवृत्त होतात. मुलांना आवश्यक मार्गदर्शनाशिवाय सोडले जाते. हे त्यांना नकारात्मक प्रभावांना अधिक संवेदनशील बनवते, असे CJI न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.

तसेच त्यांनी सायबर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांच्या वाढत्या सहभागावर देखील चिंता व्यक्त केली. देशाने आणि संस्थांनी या समस्येचा सामना करण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन अल्पवयीन गुन्हेगारांबद्दल संवेदनशीलता आणि सहानुभूतीवर जोर देऊन विकसित केले पाहिजे.

डी वाय चंद्रचूड म्हणाले, बाल गुन्हेगारीशी संबंधित प्रकरणे हाताळताना त्यांना अनौपचारिकपणे हाताळले पाहिजे आणि त्यांच्या भविष्यासाठी काय चांगले आहे ते पहावे. अनेकदा आपण त्यांच्या सुधारणेचा विचार करण्याऐवजी अल्पवयीन मुलांकडून केलेल्या गुन्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT