DY Chandrachud esakal
देश

DY Chandrachud: CJI डी वाय चंद्रचूड अचानक बोलू लागले बंगाली, सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

DY Chandrachud: चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती बोस यांना खरा बंगाली आणि बंगाली भद्रलोकातील सच्चा आणि सक्षम माणूस असे वर्णन केले.

Sandip Kapde

DY Chandrachud:

CJI DY चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयात अचानक बंगाली बोलू लागले. त्यामुळे सर्वांना अचानक आश्चर्याचा धक्का बसला. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आज बुधवार आपल्या पदावरुन निवृत्त झाले.  न्यायमूर्ती बोस सुमारे पाच वर्षे सर्वोच्च न्यायालयात राहीले. त्यांच्या निवृत्तीच्या पूर्वसंध्येला, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित केला होता. ज्यामध्ये देशाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती बोस यांचे कौतुक केले.

CJI  डी वाय चंद्रचूड म्हणाले, खंडपीठाकडून सहकाऱ्याला निरोप देणे हे खूप कठीण काम आहे. निवृत्तीच्या दिवशी मित्राला निरोप देताना, आम्ही आमच्या मित्राचा सन्मान करतो.

चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती बोस यांना खरा बंगाली आणि बंगाली भद्रलोकातील सच्चा आणि सक्षम माणूस असे वर्णन केले. बोस यांना भक्ती चळवळीच्या प्रभावाची सखोल माहिती होती. ते उत्कृष्ट न्यायाधीश आहेत आणि पदोन्नती होण्यापूर्वी ते एक उत्कृष्ट वकील होते, त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना विविध प्रकारचे खटले हाताळले आहेत.

यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड अचानक बंगाली बोलू लागले. ते बंगालीमध्ये म्हणाले, "बिचारपति श्री बोस: अक्जोन क्लासिकल बांग्ला भद्रलोक, शोभाबे उनि एकटा बुद्धिजिबी.. जस्टिस बोस शाहित्यो, इतिहास, काव्यकार एकटा बिशेष छात्र और श्री श्री राम कृष्ण डेवर पुस्तक ओनार पसंदीदा, बांग्ला भोद्रोलोक होते होले धुति पंजाबी पोर्टे होये अर फूडी होते होये।"

म्हणजेच, विद्वान असण्याबरोबरच बोस हे एक उत्कृष्ट बंगाली भद्रलोक विचारवंत आहेत. ते साहित्य, संस्कृती, इतिहास आणि काव्यशास्त्राचे विशेष विद्यार्थी राहिले आहेत. त्यांना श्री श्री रामकृष्ण देव यांची पुस्तके आवडतात. बंगाली भद्रलोकातील माणूस असूनही त्यांना पंजाबी धोतर आणि खाण्याचीही आवड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT