k-palaniswami 
देश

तमिळनाडूत सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पीटीआय

चेन्नई - तमिळनाडूतील इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यायची आवश्‍यकता भासणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज विधिमंडळामध्ये बोलताना केली. राज्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यातील पालक विद्यार्थी आणि शिक्षक अत्यंत वेगळ्या आणि अपवादात्मक अशा परिस्थितीला सामोरे जात असल्याने आम्ही विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वर्षभराच्या काळामध्ये राज्य सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. संसर्गामुळे विद्यार्थ्यांना नियमितपणे वर्गात जाणे शक्य झाले नाही. सगळे जग कोरोनाच्या विरोधात लढत असताना राज्य सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षीच्या २५ मार्चपासून राज्यातील शाळा बंद असून कोरोनाचा संसर्ग घटल्यानंतरच १९ जानेवारी रोजी इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते, असे पलानीस्वामी यांनी स्पष्ट केले.

आंध्रातील शाळांत ‘सीबीएसई’प्रणाली
अमरावती -
आंध्रप्रदेश सरकारने सरकारी शाळांमध्ये आता इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील टप्प्यामध्ये हे बदल इयत्ता आठवी ते दहावीसाठी लागू होतील. २०२४ च्या अखेरपर्यंत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग सीबीएसईच्या नियमाखाली येतील असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लालवेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT