Narendra Modi and ashok gehlot 
देश

Narendra Modi : 'लाल टोमॅटोवर चर्चा करा, लाल डायरीची नाही'; गेहलोत यांचा मोदींवर पलटवार

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : राजस्थानमधील सीकरमध्ये आज लाल डायरीचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र पीएम मोदींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली. आजकाल लाल डायरी चर्चेत आहे. त्यात काँग्रेसची काळी कृत्ये नोंदवल्याचे ऐकिवात, असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या विधानावर गेहलोत यांनी पलटवार केला.

अशोक गेहलोत म्हणाले की, पंतप्रधानांनी लाल डायरी नव्हे तर राजस्थानमध्ये लाल टोमॅटो आणि स्वस्त झालेल्या लाल सिलिंडरबद्दल बोलले पाहिजे. या लाल डायरीचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले होते की, डायरीची पाने उघडली तर सरकारचा डब्बा गुल होईल. काँग्रेसने सरकार चालवण्याच्या नावाखाली लुटीचे दुकान चालवले आहे. लाल डायरी या लुटीच्या दुकानाचे उदाहरण असल्याचंही मोदी म्हणाले होते.

गेहलोत यांनी पीएम मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, लाल डायरीऐवजी लाल टोमॅटो आणि लाल सिलिंडर स्वस्त करण्याबद्दल बोला. आा जनताच तुम्हाला निवडणुकीत लाल झेंडा दाखवेल.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये सांगितले की, "मला पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात भाषण करण्याची सूचना मिळाल्या होत्या. मात्र बुधवारी रात्री अचानक माझे भाषण काढून टाकण्यात आले. देशाच्या संघीय रचनेच्या अंतर्गत, जे काही काम केले जाते, ते केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र केले पाहिजे, असंही गेहलोत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT