Eknath Shinde esakal
देश

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

संतोष कानडे

मुंबईः फूड ब्लॉगर कामिया जानी हिने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एपिसोड केला. यावेळी कामियाला मुख्यमंत्र्यांनी मराठीचे धडे दिले. त्याचा व्हिडीओ कामियाने तिच्या 'कर्ली टेल्स' या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये कामिया मराठी शब्दांचे चुकीचे उच्चार करते. ती म्हणते- ठेच्या, त्यावर मुख्यमंत्री म्हणतात ठेच्या नाही ठेचा. कामिया पुढे म्हणते पुरणपोली, मुख्यमंत्री म्हणतात पुरणपोली नहीं पुरणपोळी.

मिसळपावला कामिया मिसलपाव म्हणते. इथेही मुख्यमंत्री तिला दुरुस्त करतात. कोतमिरवडी असं कामियाने म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी कोथिंबीरवडी असं म्हणून तिला दुरुस्त केलं. कामिया बॉम्बिलफ्राय म्हणते. मात्र मुख्यमंत्री तिला बोंबिलफ्राय, असं सांगतात.

शेवटी मुख्यमंत्र्यांच्या जिव्हाळ्याचा शब्द येतो. तो म्हणजे ठाणे. कामिया ठाना म्हणते. पण मुख्यमंत्री म्हणतात ठाना नव्हे ठाणे.. मेरी जान हैं ठाणे! असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाण्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.

महाराष्ट्र दिनानिमित्त कामियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियात लगोलग व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी कामियाने अनेक सेलिब्रिटी आणि देशातल्या शीर्षस्थ नेत्यांसोबत तिच्या कर्ली टेल्स या युट्युब चॅनेलवर एपिसोड केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT