CM Ibrahim vs HD Kumaraswamy esakal
देश

सरवण यांना आमदार बनवण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी पैसे घेतले; इब्राहिम यांचा कुमारस्वामींवर गंभीर आरोप

कुमारस्वामी यांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन चन्नपटण येथून पुन्हा जिंकून दाखवावे.

सकाळ डिजिटल टीम

दोन जागांसाठी देवेगौडांनी अमित शहांसमोर जाऊन उभे रहायला हवे होते का?

बंगळूर : टी. ए. सरवण (T. A. Saravana) यांना विधान परिषदेचे सदस्य बनवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप माजी प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम (C. M. Ibrahim) यांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांच्यावर केला. पैसे घेतले नसल्याची शपथ घेण्याचे त्यांनी आव्हान दिले.

शिवाय, कुमारस्वामी यांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन चन्नपटण येथून पुन्हा जिंकून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘कुमारस्वामी, तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या की, सरवण यांना विधान परिषदेचा सदस्य बनवण्यासाठी तुम्ही पैसे घेतले नाहीत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते अशोक आहेत. तुम्ही जाऊन त्यांच्यासमोर उभे राहणार का? दोन जागांसाठी देवेगौडांनी अमित शहांसमोर जाऊन उभे रहायला हवे होते का? चन्नपट्टणमध्ये २० हजार मुस्लिम मते मिळवून जिंकला आहात. पण ती मते कोणामुळे आली.’’

धजदचे माजी प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांना पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. धजद प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. पक्षाच्या हितासाठी इब्राहिम यांना संविधान आणि पक्षाच्या नियमांतर्गत शिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT