yogi adityanath up cm 
देश

चार वर्षात एकही दंगल नाही; योगी सरकारचे ‘रिपोर्ट कार्ड’

सकाळ डिजिटल टीम

लखनौ - उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने आज रिपोर्ट कार्ड सादर केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या चार वर्षाच्या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. चार वर्षाच्या काळात राज्यात एकही दंगल झाली नसल्याचे सांगत देशाचा राज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. नव्या उत्तर प्रदेशच्या नव्या प्रवासाला एकत्र जावू, असे आवाहन आदित्यनाथ यांनी यावेळी केले.योगी म्हणाले, चार वर्षात उत्तर प्रदेश हे देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून समोर आले आहे. जीएसडीपीच्या क्षेत्रात देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित करण्याचे आमच्या सरकारचे ध्येय राहिले आहे. 2017 रोजी सत्तेत आल्यानंतर राज्यातील अनेक गावात शाळा, रस्ते आणि विकासाचे नामोनिशाण नव्हते. एवढेच नाही तर काही आदिवासी क्षेत्रात तर मतदानाचा अधिकारही नव्हता. परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर ते अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली गेली.

चकमकीबाबत विरोधकांकडून प्रश्‍न उपस्थित केले जात असताना त्यावर योगी म्हणाले, की गुन्हेगाराचा कोणताही धर्म नसतो. योगी आदित्यनाथ म्हणाले, की गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्याने राज्यात दरोडा, बलात्कार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात घट झाली आहे. उत्तर प्रदेश ‘बिमारु राज्या’तून बाहेर पडले आहे. इज ऑफ डुइंग च्या यादीत यूपी दुसऱ्या स्थानावर आहे. सुरवातीला यूपीत केंद्राच्या योजनेला स्थान दिले जात नव्हते. केंद्राच्या योजना लागू केल्या असत्या तर यूपीत मोठा बदल झाला असता. पंतप्रधान घरकुल योजनेत यूपी पहिल्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.

चार वर्षातील कामगिरी
ऊस उत्पादकांना चार वर्षांत 1.27 लाख कोटी रुपये वाटप
पोलिस ठाण्याच्या रचनेत पायाभूत बदल.
59 पोलिस ठाणे, 4 महिला पोलिस ठाणे, 16 सायबर क्राइम स्थानकांची स्थापना
18 क्षेत्रात फॉरेन्सिक प्रयोगशाळेची स्थापना

गुन्ह्यात घट (टक्क्यांत)
दरोडा - 66
बलात्कार - ४५
हत्या/खून - १९

उत्तर प्रदेश सरकारने विविध माध्यमांतून सादर केलेल्या चार वर्षाची कामगिरीतील सत्यता खूपच कमी आहे. योगी सरकारने केलेले दावे हे प्रत्यक्षात गरीब जनतेला
मिळाले असते तर अधिक उपयुक्त ठरले असते.
मायावती, बसप नेत्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT