water 
देश

तहानलेल्या जिल्हाधिकाऱ्याला पाण्याऐवजी पाजलं चक्क अ‍ॅसिड

अ‍ॅसिड देणाऱ्या व्यक्तीला झाली अटक

शर्वरी जोशी

प्रचंड तहान लागलेला असतांना तुम्ही कधी चुकून व्हिनेगर किंवा अ‍ॅसिड प्यायलं आहे का? आता तुम्ही म्हणाल काय वेड्यासारखा प्रश्न विचारला आहे. परंतु, नजर चुकीमुळे अशी घटना अनेकदा घडत असतात. विशेष म्हणजे यावेळी ही घटना एका जिल्हाधिकाऱ्यासोबत घडली आहे. मात्र, त्यांच्या चुकीमुळे नव्हे तर दुकानदाराने केलेल्या गफलतीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क अ‍ॅसिड प्यायलं आहे. या प्रकारानंतर संबंधित दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. (Collector-in-kulgam-man-sold-acid-for-mineral-water)

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील एका दुकानदाराकडून पाण्याची बाटली विकत घेतली. मात्र, या दुकानदाराने पाण्याऐवजी चक्क अ‍ॅसिडची बाटली दिली आणि या अधिकाऱ्यांनीही नीट न पाहता पाणी समजून चक्क अ‍ॅसिड प्यायलं. अ‍ॅसिड प्यायल्यानंतर अधिकाऱ्यांच्या तोंडाची आग होऊ लागली आणि त्यांना संबंधित प्रकार उलगडला. त्यामुळे या प्रकरणी दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.

कुलगाव जिल्ह्यातील दम्हाल हाजीपुरा येथे जिल्हाधिकारी त्यांच्या टीमसोबत पाहणी करण्यासाठी आले होते. बेकायदेशीर सुरु असलेल्या उद्योग-व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी त्यांची टीम काम करत होती. याच वेळी तहान लागल्यामुळे त्यांनी जवळच्या दुकानातून पाणी खरेदी केलं. परंतु, त्यांना पाण्याऐवजी बॅटरीचं अ‍ॅसिड देण्यात आलं.

दरम्यान, सध्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. मात्र, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube वर आता Views चा खेळ बदलणार! २४ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, नेमका काय झालाय बदल?

Ganesh Bidkar : राष्ट्रवादीशी मैत्री राज्यात, पुण्यात नाही! अमोल बालवडकर यांचा निधी केला शून्य

Raksha Bandhan 2026: यंदा रक्षाबंधन नेमकं कधी? 27 की 28? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त; चंद्रग्रहणाचं काय?

Snakebite : सर्पदंश हा ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित; प्रत्येक दंशाची नोंद आरोग्‍य विभागाला कळविणे बंधनकारक

Beed News : बीड जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार! ​सिझेरियन करताना पोटातच सोडले ग्लोज; आतडे सडले अन् गर्भाशय काढावे लागले; १९ वर्षीय माता मरणाच्या दारात

SCROLL FOR NEXT