Manpreet Singh 
देश

Video: अनंतनागमध्ये शहीद झालेल्या वडिलांना चिमुकल्याचा लष्करी गणवेशात कडक सॅल्युट

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये कर्नल मनप्रीत सिंह दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत कर्नल मनप्रीत सिंग शहीद झाले. त्यांचं पार्थिव पंजाबमधील मोहाली इथल्या घरी शुक्रवारी आणण्यात आलं, त्यांना अखेरचा निरोप देताना एका प्रसंगामुळं उपस्थितांना गहिवरुन आलं.

त्याचं कारण म्हणजे मनप्रीत सिंग यांनी यांच्या लहान मुलानं वडिलांसारखा लष्करी गणवेश परिधान केला होता तसेच लहान मुलीनं त्यांना अखेरचा सॅल्युट केला. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Colonel Manpreet Singh son wearing camouflage daughter salute father)

तिसऱ्या पिढीतला जवान शहीद

शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांना दोन मुलं आहेत. यांपैकी ६ वर्षांचा मुलगा कबीर तर अडीच वर्षांची मुलगी वाणी अशी त्यांची नावं आहेत. वडिलांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कारावेळी या दोघांनी लष्करी गणवेशात आपल्या वडिलांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम केला. सिंग कुटुंबातील तिसऱ्या पिढितला सैन्यातील जवान असलेल्या मनप्रीत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि दोन मुलं आहेत. (Latest Marathi News)

अनंतनागमध्ये काय घडलं?

जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातील कोकोरेनाग भागात तीन दिवसांपासून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करानं मोहिम उघडली आहे. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. (Marathi Tajya Batmya)

यामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे दोन अधिकारी आणि एक स्थानिक पोलीस शहीद झाले. शहिदांमध्ये कर्नल मनप्रीत सिंग हे राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. तर जम्मू आणि काश्मीरचे अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस उपाधिक्षक हुमायू भट हे गंभीर जाखमी झाले होते. नंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT