Rahul Gandhi 
देश

'कमांडर-इन-थीफ'वरील मानहानी खटला; राहुल गांधींची मुंबई हायकोर्टात धाव

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस नेते राहुल गांधींवर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यातीलच एका खटल्यासंदर्भात आता राहुल गांधींनी आपल्या बचावासाठी आज बुधवारी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. राहुल गांधींनी केलेल्या 'कमांडर-इन-थीफ'च्या वक्तव्यावरुन हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधींनी त्यावेळी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्रातील एका भाजप समर्थकाने राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. याचिकाकर्ता महेश श्रीश्रीमाल यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलंय की, राहुल गांधींनी 2018 मध्ये राफेल विमान व्यवहारावरुन पंतप्रधान मोदींवर टीकास्त्रा डागलं होतं. मात्र, त्यावेळी केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह होतं.

या याचिकेनंतर मुंबईतील एका न्यायालयाने ऑक्टोबर 2019 मध्ये राहुल गांधींना समन्स जारी केला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी न्यायालयासमोर हजर झालेले नव्हते. आता मानहानीच्या या खटल्याला निपटण्यासाठी आणि तो निरस्त करण्यासाठी राहुल गांधींचे वकील कुशल मोर यांनी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश एस के शिंदे यांच्यासमोर अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, ती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात करण्यात आली होती. याचिकाकर्त्याचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही.

मात्र, दुसरीकडे श्रीश्रीमाल यांचं म्हणणं आहे की, पंतप्रधानांच्या समर्थकांना या वक्तव्यामुळे ठेच पोहोचली आहे. त्यांनी दावा केलाय की, राहुल गांधींनी केवळ पंतप्रधानांची नव्हे तर भाजपच्या सर्व सदस्यांना बदनाम केलंय. त्यांच्या या याचिकेवर हायकोर्ट 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे.

केंद्रावर साधला निशाणा

तर दुसरीकडे राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधानांनी आपल्या मित्रांसाठी आता आणखी संपत्ती नव्हे तर सामान्यांसाठी योग्य नीती तयार केली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 Squad: हार्दिक पांड्याकडे पुन्हा उप कर्णधारपद? शुभमन गिलच्या निवडीवरून माजी खेळाडूचं मोठं विधान, बरोबर १ तासानंतर 'गेम' होणार?

Thane Politics: ठाकरे गटाला मोठं खिंडार! बड्या शिलेदारानं सोडली साथ, हाती कमळ घेतं भाजपात प्रवेश

Ajwain Water at Night: वजन, पचन आणि पोटाची चरबी! दररोज 21 दिवस ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरात होतात 'हे' बदल

Karad News : सोमनाथ भोसलेंनी साकारलेली ११ फुटी हनुमानाची मूर्ती लवकरच ऑस्‍ट्रेलियाला होणार रवाना

Bangladesh Crisis: बांगलादेश पेटला! युवा नेत्याच्या हत्येनंतर राजधानीत आग, वर्तमानपत्रांची कार्यालये जळाली; देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT