work from home sakal
देश

नवीन नियमांची घोषणा, 'या' झोनमधील लोकांना एक वर्ष करता येणार घरुन काम

आणि ही मुभा 50 टक्के कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी दिली.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनामुळे अनेक कंपनीना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली होती.मात्र कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येताच कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलविण्यात आले.पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की आता एका वर्षासाठी भारतात कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवागनी दिली जाणार आहे तर? हो, हे खरंय.पण फक्त काही झोनच्या कर्मचाऱ्यांसाठी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

विशेष आर्थिक क्षेत्रात (SEZ) मध्ये जास्तीत जास्त एका वर्षासाठी घरून काम (WFH) करण्याची परवानगी दिली जाणार आहे आणि हि मुभा 50 टक्के कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी दिली.

वाणिज्य विभागाने विशेष आर्थिक क्षेत्र नियम, 2006 द्वारे घरून काम करण्यासाठी नियम 43A जारी केलाय. उद्योगांकडून आलेल्या मागणीच्या आधारे ही अधिसूचना जारी करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. उद्योगाने सर्व विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी घरुन काम करणाऱ्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती.

नवीन नियमांनुसार युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काही श्रेणींना घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. या कर्मचाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि SEZ युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली जाऊ शकते. यामध्ये युनिटमधील कंत्राटी कामगारांचाही समावेश आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की घरातून काम करण्यास आता फक्त एक वर्षाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र युनिटच्या आयुक्त यांच्या सांगण्यावरुन यात मुदतवाढही होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्ग मोजणीदरम्यान तणाव; पोलिसांनी महिलेचे मंगळसूत्र तोडल्याचा राजू शेट्टींचा आरोप

महाभारतात मुख्य भूमिका साकारणारे हे दोन कलाकार होते सख्खे भाऊ; एकाने भीष्माला मारलं तर दुसरा कपटी खलनायक

Mumbai News: मुंबईची वेगळी ओळख निर्माण होणार! चार प्रवेशद्वारांवर क्लॉक टॉवर उभारणार, रितू तावडेंची मोठी घोषणा

ChatGPT: मोदींसमोर 'चॅट जीपीटी'चा मालकही गोंधळला! प्रतिस्पर्ध्याचा हात हातात का घेतला नाही? सांगितलं कारण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ३२९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर चार कोटी जमा; आणखी ८६ कोटींची गरज, काय आहे याेजना?

SCROLL FOR NEXT