3-lpg-cylinder-free-for-people 
देश

हे एप्रिल फुल नव्हे! गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज नव्या महिन्याची सुरुवात! आजचा दिवस एप्रिल फुल म्हणून ओळखला जात असला तरी ही बातमी काही तुम्हाला फूल करण्यासाठी नसून वास्तव आहे. आज पुन्हा एकदा महागाई वाढली असून सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले आहेत. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. नवी दिल्लीमध्ये आता कमर्शियल सिलेंडर 2,253 रुपयांचा झाला आहे. (LPG Cylinder)

चेन्नईमध्ये सर्वाधिक दर

कमर्शियल सिलेंडरच्या दरामध्ये 250 रुपयांची भाववाढ झआली आहे. या भाववाढीनंतर आता कोलकातामध्ये हा सिलेंडर 2,351 रुपयांचा झाला आहे. मुंबईमध्ये 2,205 रुपयांचा तर चेन्नईमध्ये 2,406 रुपयांचा झाला आहे. याआधी सरकारने एक मार्च रोजीच 105 रुपयांची घसघशीत भाववाढ केली होती. तर गेल्या 22 मार्च रोजी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवले होते, तेंव्हा याचे दर 9 रुपयांनी स्वस्त केले होते. इंधन कंपन्यांनी एक एप्रिलला घरगुती सिलेंडरच्या दरात भलेही वाढ केली नसेल मात्र, अगदी दहा दिवसांपूर्वीच म्हणजेच 22 मार्च रोजी सरकारने सामान्यांचं आर्थिक बजेट बिघडवून टाकलं आहे. (LPG Cylinder)

पेट्रोल-डिझेलच्या भावांनी केलं एप्रिल फुल

गेल्या १० दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे आजही वाढ होणार असं वाटत असतानाच त्या दरांनी आपल्याला एप्रिल फुल केलं आहे. आज या दरांमध्ये वाढ आज झालेली नाही. मुंबईत आज कालच्या एवढेच पेट्रोल, डिझेलचे दर आहेत. पेट्रोल प्रति लीटर 116.72 रुपये आणि डिझेल प्रति लीटर 100.94 रुपये एवढे आहे. तर पुण्यात पेट्रोल 116.38 प्रती लीटर आणि डिझेल 99.12 रुपये प्रती लीटर आहे. पुण्यामध्ये १२ पैशांनी डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. (Petrol-Diesel Price)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT