देश

म्हैस दूध देईना; मालकाची थेट पोलिसांत तक्रार!

सकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण पोलिसांसमोर आले आहे. आपली म्हैस दूध काढून देत नाही, म्हणून एका व्यक्तीने म्हशीसह थेट पोलिस स्टेशन गाठलं आणि म्हशीविरोधात तक्रार करत आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा अशी मागणी पोलिसांकडे केली. त्याची तक्रार ऐकून पोलिसही हैराण झाले. नंतर या रंजक प्रकरणाची उकलही पोलिसांनी रंजक पद्धतीनेच केली .

४५ वर्षीय छोटेलाल यादव उर्फ बाबूराम असं तक्रार करणाऱ्या इसमाचं नाव असून तो मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील नयागावचा रहिवाशी आहे. आपली म्हैस दूध देत नाही म्हणून त्यानं थेट नयापूर पोलिस स्टेशन गाठलं आणि म्हशीविरुद्ध तक्रार केली. तसा लेखी अर्जही त्यानं दिला. त्याची ही तक्रार ऐकून सुरुवातीला पोलिसही अचंबित झाले, परंतू नंतर त्यांनी बाबुरामला समजावून घरी पाठवले.

पण, थोड्या वेळाने तो पुन्हा पोलिस स्टेशनला आला; पण यावेळी त्यानं त्याची म्हैसही सोबत आणली आणि पोलिस स्टेशनबाहेर बांधली. आता त्याने पोलिसांना म्हशीचे दूध काढण्यास मदत करण्यास सांगितले. हे पाहून नयागाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांनाही हे प्रकरण इतके सोपे नसल्याचे समजले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Kalmadi: पुण्यात कलमाडींनी पंतप्रधानांना चप्पल मारली अन्... दिल्ली हादरली पण काँग्रेस वाचली, नेमकं काय घडलं होतं?

DEVDUTT PADIKKAL : गौतम गंभीरला 'नकोसा' झालेल्या फलंदाजाची विक्रमी कामगिरी; तरीही मिळणार नाही टीम इंडियात संधी, कारण...

Latest Marathi News Live Update : लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांना रितेश देशमुखचं उत्तर

Wardha News:धक्कादायक प्रकार! प्रशिक्षणात विस्तार अधिकाऱ्याने मद्यधुंद हाेवून घातला धिंगाणा; वर्धा जिल्ह्यात खळबळ..

PCMC Election : भाजप-राष्ट्रवादीमधील लढती लक्षवेधी! जुन्या चेहऱ्यांची नवी समीकरणे; अनेक प्रभागांत प्रतिष्ठेची लढाई

SCROLL FOR NEXT