मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील सरकारी आरोग्य केंद्रामध्ये भयानक प्रकार पाहायला मिळाला. एक वृद्ध महिला डोक्यावर झालेल्या जखमेवर उपचार करून घेण्यासाठी आली असता डॉक्टरांनी तिच्या जखमेवर मलमपट्टी करताना कापसाच्या जागी कंडोमचं रिकामी पाकीट चिकटवलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (condom empty packet tied elderly woman head during dressing morena govt hospital)
धर्मगढ गावातील महिलेच्या डोक्याला झालेल्या दुखापतीतून रक्तस्त्राव थांबवण्यासाठी कंडोमच्या पाकिटाचा वापर करत तात्पुरती मलमपट्टी म्हणून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आले.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार मुरैना जिल्ह्यातील पोरसा परिसरातील धरमगड गावामध्ये राहणारी ७० वर्षीय महिलेच्या डोक्यावर वीट पडून जखम झाली होती. त्यामुळे होत असलेला रक्तस्राव थांबत नसल्याने तिचे नातेवाईक तिला घेऊन पोरसा रुग्णालयात पोहोचले होते. तिथे तिच्या जखमेवर मलमपट्टी करण्यात आली.
त्यानंतर सदर महिला अधिक उपचारांसाठी मुरैना येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचली. तिथे तिच्या डोक्यावरील पट्टी काढली असता डॉक्टरांना धक्का बसला. या महिलेच्या जखम झालेल्या घावाच्या ठिकाणी कापसाऐवजी कंडोमचं रिकामी पाकीट चिकटण्यात आलं होतं.
या प्रकरणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रकरणच वाढताच मुरैनाचे एडीएम नरोत्तम भार्गव यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.