BJP 
देश

भारतीय जनता पक्षामधील विसंवाद चव्हाट्यावर

पीटीआय

लखनौ - उत्तर प्रदेशातील नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याने अल्पसंख्याक समुदायाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत. 

हे वक्तव्य करणारे मेरठ शहराचे पोलिस निरीक्षक अखिलेश नारायणसिंह यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे वक्तव्य हे सर्व मुस्लिम समुदायाबाबत नव्हते, असे मौर्य यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकारी अखिलेश नारायणसिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात काळ्या पिवळ्या पट्या बांधून आंदोलन करणाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावे, असे वक्तव्य केले होते. 

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही पोलिस अधिकाऱ्याच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे, उत्तर प्रदेशप्रमाणेच देशभर मुस्लिम समाजाचे वास्तव्य असून, हे सगळे भारतीय आहेत, पाकिस्तानी नाहीत. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. अशाप्रकारच्या पोलिस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी केली जावी आणि त्यात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे मायावती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्‍त्याने मात्र पोलिस अधिकाऱ्याच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी-पुस्तिका (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) यांसारख्या मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवर विचारमंथन होणे गरजेचे आहे. याविरोधात आंदोलन करण्याऐवजी लोकांनी केंद्र सरकारला सूचना कराव्यात.
- वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Raid On Ambani Companies : अंबानींच्या कंपन्यांवर १० ते १२ ठिकाणी छापेमारी, १५ पथके तपासात

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेसाठी नोंदणी आजपासून सुरू

IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका

SCROLL FOR NEXT