Gulam Nabi Azad 
देश

कॉंग्रेस सोडताना आझादांचे सोनिया गांधींना पाच पानी पत्र, केला मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आधीपासूनच संकटात असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आज पुन्हा एकदा मोठा झटका बसला, पक्षेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेसह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांनी कॉंग्रेस आध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे राजीनामा पत्र लिहीत त्यांच्या या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानी लिहिलेल्या पत्रात त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पक्ष सोडण्याच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली.

सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिलं आहे की, "अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे." तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असा सल्लाही गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे.

तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

आझाद यांनी कॉंग्रेसचे नेते आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला, ते म्हणाल की, 2019 मध्ये राजीनामा दिल्यानंतर राहुल यांनी यूपीएच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला. सरकारचे रिमोट कंट्रोल मॉडेल काँग्रेसमध्ये लागू करण्यात आले आहे. आता राहुल गांधी किंवा त्यांचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी कॉंग्रेसमध्ये निर्णय घेतात, असा खुलासा देखील त्यांनी या पत्रात केला आहे.

याआधी गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्मीरमधील प्रचार समितीचे अध्यक्ष बनवल्यानंतर अवघ्या दोन तासांतच ते पद सोडले होते. समित्यांच्या स्थापनेमुळे आझाद नाराज असल्याचे बोलले जात आहे. समित्या स्थापन करताना त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची आझाद यांची तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT