Cognizant 
देश

'लॉकडाऊन'मध्ये काम करणाऱ्यांना 'ही' कंपनी देणार २५ टक्के ज्यादा पगार!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' चे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करताना कोणती अडचण येऊ नये, यासाठी शक्य तेवढ्या उपाययोजनाही कंपन्या करत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज, एअरटेल, टाटा स्टील या कंपन्यांनी लॉकडाऊन काळातही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यानंतर आता कॉग्निझंट कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असाच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

आयटी क्षेत्रातील नामाकिंत कंपनी म्हणून कॉग्निझंट प्रसिद्ध आहे. या कंपनीने असोसिएट आणि त्याखालील पदांवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात २५ टक्के वाढ केली आहे. एप्रिल महिन्याच्या पगारापासून ही वाढ देण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळातही कंपनीच्या कामात खंड पडू न देता कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरू ठेवले. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना २५ टक्के ज्यादा पगार देण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.२८) घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावरच त्यांची ही वाढ अवलंबून असणार आहे. 

सव्वालाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा 

कॉग्निझंट कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा जवळपास १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. डिसेंबर २०१९ च्या आकडेवारीनुसार कंपनीचे २,०३,७०० कर्मचारी आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या बाबतचा संदेश पाठविण्यात आला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हंपरीज यांनी म्हटले आहे की, पगारातील वाढ ही एप्रिल महिन्याच्या मासिक वेतनासोबत दिली जाणार आहे. या अडचणीच्या काळात कंपनीचे कर्मचारी ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांचे हे प्रामाणिक प्रयत्न, निष्ठा आणि साहस याचा आम्ही सन्मान करत आहोत. 

हंपरीज पुढे म्हणाले की, 'भारत आणि फिलिपिन्स या देशांमधील आमच्या असोसिएट्सना सेवा पुरविण्यासाठी कंपनीचे कर्मचारी हे प्रयत्न करत आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या मूळ वेतनामध्येच २५ टक्के पगारवाढ करण्यात येत आहे.' कोरोना व्हायरस ही महामारी हे या दशकभरातील सर्वात मोठे संकट आहे. जगभरातील सर्वच कंपन्या या महामारीमुळे होणाऱ्या नुकसानाचा सामना करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT