Rahul Gandhi
Rahul Gandhi  
देश

Congress : "पंतप्रधानांनी भक्तांची माफी मागावी..." PM मोदींच्या बजरंगबलींच्या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक!

Sandip Kapde

हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाशी भगवान हनुमानाची तुलना केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी विनंती केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय वार पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी असा सामना रंगला आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांनी बजरंग दल या संघटनेवर बंदी घालणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, काँग्रेसचे कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.

भगवान हनुमान हे पवित्रता, भक्ती आणि कर्तव्य, सेवा आणि त्याग याच्या प्रति वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची त्याच्याशी तुलना करणे हा हनुमानाचा अपमान आहे, असे रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले.

रणदीप सुरजेवाला म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानजींच्या लाखो भक्तांच्या भावना दुखावत आहेत. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांनी बजरंग दल आणि द्वेष पसरवणाऱ्या इतर संघटनांवर निर्णायक कारवाईचे आश्वासन दिल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली होती.

आधी त्यांनी (काँग्रेस) भगवान रामांना तुरुंगात ठेवले आणि आता बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी करून ते भगवान हनुमानाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT