Rahul Gandhi 
देश

"शक्ती नव्हे येशूच खरा देव"; राहुल गांधींच्या यात्रेत पाद्रीच्या विधानावर भाजपचा आक्षेप

राहुल गांधींची 'भारत तोडो' यात्रा असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रेदरम्यान ते विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. राहुल गांधींच्या या यात्रेवर भाजपचं बारीक लक्ष असून वाद निर्माण होतील अशा गोष्टी सध्या भाजपच्या आयटीसेलकडून जाहीर केल्या जात आहेत. त्यातच आता भाजपनं एक नवा व्हिडिओ समोर आणला आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या ख्रिश्चन धर्मगुरुंसोबतच्या एका बैठकीत "शक्ती नव्हे येशू हाच खरा देव आहे," असं विधान एका पाद्रीनं केलं. यावरुन भाजपनं राहुल गांधींना टार्गेट केलं आहे. (Jesus is real God not Shakti Priest tells Rahul Gandhi BJP hits back says Bharat todo Yatra)

राहुल गांधींच्या या व्हायरल व्हिडिओत ते पाद्रींना विचारतात की, जिजस ख्राईस्ट हे देवाचे रुप आहेत का? हे योग्य आहे का? त्यावर उत्तर देताना पाद्री पौन्नैय्या म्हणतात, "होय जिजस ख्राईस्ट अर्थात येशू हाच खरा देव आहे. त्याचं रुप शक्तीसारखं (हिंदू देवी) नाही"

राहुल गांधी आणि पाद्रींच्या बैठकीच्या या व्हिडिओवर भाजपनं आक्षेप घेतला असून काँग्रेसची ही भारत तोडो यात्रा आहे. यावर काँग्रेसनं प्रत्युत्तर देताना भाजपची ही आणखी एक खोडी आहे. काँग्रेसच्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहुन भाजप हताश झाली आहे.

पाद्री पोन्नैयांना झाली होती अटक

दरम्यान, ज्या तामिळ पाद्री पोन्नैया यांनी हे विधान केलं आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकदा अशी वादग्रस्त विधानं केली आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात पोन्नैया यांना वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अटक झाली होती. मदुरैच्या कालीकुडी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, द्रमुक सरकारच्या मंत्री आणि इतरांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी अटक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT