देश

सपना म्हणते, 'काँग्रेस प्रवेशाची अफवाच, मी तर कलाकार'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : डान्सर सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून केल्या जात होत्या. मात्र, आता स्वत: सपना चौधरी यांनी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे सांगितले. तसेच आगामी निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही, असेही स्पष्ट केले.

सपना चौधरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्या निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता सपना चौधरीने याचे खंडन केले आहे. त्याबाबत बोलताना सपना म्हणाली, मी एक डान्सर आहे. माझ्या काँग्रेस प्रवेशाबाबत कोणी वक्तव्य केले मला माहीत नाही. त्यांना काय उत्तर द्यायचे हेही मला माहीत नाही. माझे कोणतेही ट्विटर अकाउंट नाही. मला कोणाचेही देणं-घेणं नाही. तसेच काँग्रेस नेते राज बब्बर यांची मी भेट घेतली नाही. याशिवाय प्रियांका गांधी यांच्याशी मी पहिल्यांदाच भेट घेतली होती. प्रियंका गांधी यांच्यासोबत असलेला माझा फोटो जुना आहे. 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा माझा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT