kuldeep bishnoi
kuldeep bishnoi Sakal
देश

क्रॉस वोटिंग : काँग्रेसची मोठी कारवाई; बिश्नोईंची हकालपट्टी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग (Cross Voting) केल्याप्रकरणी काँग्रेसकडून कुलदीप बिश्नोई यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना पक्षाच्या सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे. बिश्नोई यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारसही काँग्रेस हरियाणा विधानसभेच्या अध्यक्षांकडे करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. (Congress expels Party MLA Kuldeep Bishnoi )

निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्वीट केले होते की, 'फन कुचलने का हुनर आता है मुझे, सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा करते.' असे ट्वीट बिश्नोई यांनी केले होते. योग्य वेळी घेतलेला निर्णय एखाद्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे करतो असेही ते म्हणाले होते.

माकन का हरले?

रिटर्निंग ऑफिसर आरके नंदल यांनी सांगितलं की, भाजप नेते पंवार यांना 36 मतं मिळाली, तर कार्तिकेय शर्मा यांना 23 प्रथम पसंतीची मतं मिळाली आणि 6.6 मतं भाजपकडून हस्तांतरित झाली. त्यांची एकूण मतांची संख्या 29.6 झाली. या लढतीत माकन यांना 29 मतं मिळाली. मात्र, दुसऱ्या पसंतीचं मत न मिळाल्यानं त्यांचा पराभव झाला.

89 आमदारांनी केलं मतदान

राज्यसभा निवडणुकीत एक मत 100 इतकं मानलं जातं. हरियाणात 90 पैकी 89 आमदारांनी मतदान केलं, तर अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केलं नाही. शिवाय, काँग्रेसचं एक मत निवडणूक आयोगानं रद्द केलं. त्यामुळं 88 मतं शिल्लक होती, म्हणजे 8800 मतं. दरम्यान, विजयासाठी 8800/3+1 म्हणजेच 2934 मतांची गरज होती. भाजपचे कृष्णलाल पंवार यांच्या विजयानंतर 66 मतं शिल्लक होती, जी कार्तिकेय यांच्याकडं हस्तांतरित करण्यात आली. कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना 29-29 (2900-2900) मतं मिळाली. दोघंही समान होते, पण भाजपला 66 मतं मिळाल्यानं कार्तिकेयची मतं 2966 झाली आणि ते विजयी झाले. काँग्रेसला क्रॉस व्होटिंग आणि एक मत अवैध ठरल्यानं हा सारा खेळ अंगलट आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT