Karnataka Election 2023 
देश

Karnataka Election: ‘ऑपरेशन लोटस’ विरुद्ध काँग्रेसची ‘फिल्डींग’; सत्ताधारी भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार

स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सत्ताधारी भाजपचा प्लॅन ‘बी’ तयार

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे; पण निकालापूर्वीच काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) हे तिन्ही पक्ष पुढील सरकार स्थापण्याच्या योजना आखत आहेत. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना बंगळूरला येण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘ऑपरेशन कमळ’ टाळण्यासाठी विजयी उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येईल. दुसरीकडे स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सत्ताधारी भाजपचा प्लॅन ‘बी’ तयार असल्याची माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.

काही मतदानोत्तर चाचण्यांमुळे काँग्रेसला सरकार स्थापनेचा विश्वास वाटत आहे, भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा करीत आहे.

काँग्रेसने उमेदवारांना बंगळूरमध्ये येऊन विशिष्ट ठिकाणी थांबण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी मिळणार असून प्रलोभनांना बळी पडू नका, असा सल्ला वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना दिला आहे.

विजय निश्चित होताच जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी उमेदवारांना बंगळूरला घेऊन यावे आणि सरकार स्थापन होईपर्यंत एका ‘रिसॉर्ट''मध्येच थांबावे असे बजावण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर चिंता व्यक्त केली आहे की, काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवू शकला नाही, तर भाजप त्यांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करू शकते.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सूरजेवाला यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी सुमारे दोन तास चर्चा केली. सूरजेवाला यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर असलेले प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह नेत्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स'' घेतली.

काँग्रेसचे ‘लक्ष्य'' अपक्ष

बहुमतासाठी चार ते पाच जागा कमी मिळाल्यास काँग्रेसला अपक्ष आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांना आकर्षित करण्याचा विचार करीत आहे. गौरीबिदनूरमधून अपक्ष उमेदवार पुट्टस्वामी गौडा आणि राणेबेन्नूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार आर. शंकर विजयी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसकडून तसे प्रयत्न आताच सुरू असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT