Congress gives Promises but we Fulfill that says Jitendrasingh
Congress gives Promises but we Fulfill that says Jitendrasingh 
देश

काँग्रेसवाले फक्त आश्वासनं देतात; आम्ही ती पूर्ण करतो...

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध विभागांतील 4 लाख रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या आर्थिक वर्षातच ती पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत सांगितले.

काॅंग्रेसच्या यंदाच्या निवडणूक जाहीरमान्यात हेच आश्वासन दिलेले होते पण त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली, असाही टोला त्यांनी लगावला.

के. सी. राममूर्ती, आनंद शर्मा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंह यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रिक्त जागांची संख्या 7 लाखांच्या घरात गेल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, सध्या 6 लाख 83 हजार 23 रिक्त जागा आहेत. मात्र त्यातील अनेक जागा भरण्याची प्रक्रिया रेल्वे व यूपीएससीने सुरू केली आहे.

राममूर्ती यांनी, 4 लाख रिक्त जागा असल्याचे सांगितल्यावर जितेंद्र सिंह यांनी ही भरती प्रक्रिया याच आर्थिक वर्षात सुरू केली जाईल असे सांगितले. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारी रिक्त पदांच्या भरतीचे प्रमाण वाढले आहे. 2013-14 मध्ये केंद्रीय रिक्त पदांचे प्रमाण 16.2 टक्के होते ते आता 11.3 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. जी पदे राज्य सरकारांच्या अखत्यारीत असतात ती भरली जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सांगताना त्यांनी भाजपचे सरकार येऊ घातलेल्या कर्नाटकाचे उदाहरण दिले. वैज्ञानिक संस्थांमध्ये योग्य उमेदवार मिळत नाहीत हा अनुभव असल्याने अधिकाऱयांना मुदतवाढ द्यावी लागते. या रिक्त जागांच्या भरतीत पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील डीओपीटी नियंत्रण ठेवत नाही, असाही जितेंद्र सिंह यांनी दावा केला. 

वस्त्रोद्योग मंत्रालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या टेक्स्टाईल पार्कसाठी मालेगाव व भिवंडीसारख्या शहरांची निवड करणार का, असे हुसेन दलवाई यांनी विचारले. त्यावर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी, मालेगाव किंवा इचलकरंजीत अशी टेक्साईल पार्क उभारण्याचा प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही त्यामुळे तेथे ती होणार नाहीत असे स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT