shashi tharoor sakal
देश

थरूर यांना गाढव म्हणलेल्या काँग्रेस नेत्याकडून माफी

थरुर यांनीही त्यांची माफी स्वीकारल्याचे जाहीर केले

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद/नवी दिल्ली ः काँग्रेसचे प्रसिद्ध वरिष्ठ नेते शशी थरूर यांना गाढव संबोधल्याबद्दल काँग्रेसच्या तेलंगण शाखेचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी माफी मागितली आहे. थरुर यांनीही त्यांची माफी स्वीकारल्याचे जाहीर केले आहे, मात्र हे एकूणच प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.

तेलंगणमधील सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याचे थरुर यांनी कौतुक केले होते. त्यामुळे रेवंथ यांनी त्यांच्याविरुद्ध अनुचित उद्गार काढले होते. रेवंथ यांनी ट्विट केले. त्यांनी म्हटले की, हे वक्तव्य मागे घेत असल्याचे श्री. थरुरजी यांना मी कळविले आहे. वरिष्ठ सहकाऱ्याविषयी परमोच्च आदर वाटत असल्याचा पुनरुच्चारही मी केला.

थरुर म्हणाले की, रेवंथ यांनी मला दूरध्वनी केला. ते अत्यंत अदबीने बोलले. जे काही बोललो त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. मी ती स्वीकारली असून हे दुर्दैवी प्रकरण बाजूला ठेवून पुढे वाटचाल करण्याची माझी इच्छा आहे.

वास्तविक रेवंथ यांनी प्रारंभी या वक्तव्याचा इन्कार केला होता. रामाराव हे खोटे बोलत असून खोट्या बातम्या पसरवीत असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

‘पाहुणा कलाकार’ टिप्पणी

गेल्या वर्षी लोकसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद के. सुरेश यांनी थरूर यांना धारेवर धरले होते. थरूर यांचा ‘पाहुणा कलाकार’ असा उल्लेख त्यांनी केला होता. त्यामुळे वाद निर्माण होताच सुरेश यांनी विधान मागे घेतले होते. या वादास जी-२३ गटातील नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्राची किनार होती.

वाद नेमका कशामुळे?

थरूर यांनी अलीकडेच हैदराबादला भेट दिली. त्यावेळी तेलंगण राष्ट्र समितीचे आयटी मंत्री के. टी. रामाराव यांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. रेवंथ यांना हे अजिबात पसंत पडले नाही. ‘थरूर आणि रामाराव हे दोन्ही नेते एकाच गटात मोडतात. इंग्लिश सफाईदारपणे बोलता येते म्हणून ती व्यक्ती ज्ञानी नसते,’ असा टोला लगावून ते म्हणाले होते की, ‘थरूर हे काँग्रेस पक्षासाठी ओझे असल्याचे सिद्ध होत आहे. ते गाढव आहेत आणि पक्ष त्यांची हकालपट्टी करेल अशी आशा आहे.’

या आधीही वाद

विरोधी नेत्यांची बाजू घेण्यावरून थरूर यांनी वाद निर्माण करण्याचे हे पहिले उदाहरण नाही. सुमारे दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधील ज्येष्ठ सहकारी जयराम रमेश यांनी केलेल्या विधानास त्यांनी पाठिंबा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुष्ट असल्याची टीका सतत करणे ही परिणामकारक रणनीती नसल्याचे रमेश म्हणाले होते. त्यास सहमती दर्शविताना थरूर म्हणाले होते की, मोदी जेव्हा एखादी योग्य गोष्ट बोलतात किंवा करतात तेव्हा त्यांची प्रशंसा केली पाहिजे. थरूर यांच्या विधानामुळे केरळमधील ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन भडकले होते. मोदींचे कौतुक करणाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. मोदींचे कौतुक करून भाजप राजवटीत लवकरच मंत्री बनू असे कोणत्याही काँग्रेस नेत्याने मानू नये, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT