jalaun incident 
देश

काँग्रेस नेत्याची 'दे धुलाई', मुलींची छेड काढल्याचा आरोप

सकाळ ऑनलाईन टीम

जलौन: उत्तर प्रदेशात काँग्रेसचे जिल्हाप्रमुख अनुज मिश्रा यांच्यावर जालौनमध्ये छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिलांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. महिलांनी सांगितले की, याबद्दलची तक्रार प्रदेश काँग्रेस अध्यक्षाकडे केली होती, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 

आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पक्षाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पोलिसांनीही याबद्दलची चौकशी सुरू केली आहे.  यादरम्यान अनुज मिश्रा यांनी स्वत:वरील आरोप हे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले आहे.

हे प्रकरण जलौन जिल्ह्यातील उरई कोतवाली परिसरातील असून तेथे दोन महिलांनी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनूज मिश्रा यांच्यावर छेडछाडीचा आरोप केले आहेत. छेडछाडीला कंटाळून त्यांनी मिश्रा यांना मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जालौन जिल्ह्यातील उरई रेल्वे स्टेशनजवळचा असून त्यात दोन्ही महिला अनुज मिश्राला चपलांनी मारताना दिसत आहेत. 

याबद्दल तक्रारदार महिलांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून मिश्रा आम्हाला त्रास देत होते. याबद्दलची तक्रार आम्ही अजयकुमार लल्लूंकडे तक्रार केली पण त्याचा काही उपयोग झाला  नाही.

तपासाला सुरुवात-
या प्रकरणात काँग्रेसने पाच सदस्यीय समिती स्थापन केली असून तो आपला अहवाल पक्ष नेतृत्वाला सादर करणार आहेत. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासाच्या आधारे या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT