BJP-Congress esakal
देश

'मी भाजपात प्रवेश केला नाही म्हणून मला तुरुंगात टाकलं'

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे.

बेळगाव (कर्नाटक) : सध्या कर्नाटकात विधान परिषदेच्या (Legislative Council Election Karnataka) निवडणुकांना रंग चढला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आपण भाजपाला (BJP) कधीच पाठिंबा दिला नाही, तसेच भाजपात प्रवेशही केला नाही, त्यामुळं त्यांनी मला 50 दिवस तिहार तुरुंगात ठेवलं होतं, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे (Congress Karnataka) प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी सोमवारी बेळगावात केला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.

डीके शिवकुमार म्हणाले, राज्यातील भाजपा सरकार (BJP Government) देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. मी तिहार तुरुंगात गेलो, कारण भाजपानं मला पाठवलं. मी भाजपला पाठिंबा दिला नाही, त्यांच्यासोबत गेलो नाही, त्यामुळं त्यांनी मला तुरुंगात टाकलं, असा आरोपही शिवकुमारांनी भाजपवर केलाय. शिवकुमार तिहार तुरुंगात का गेले होते, असा सवाल भाजपा नेत्यांनी केला होता. त्यावर डीकेंनी प्रत्युत्तर दिलंय.

डीके पुढे म्हणाले, सर्व काही सर्वांना माहित आहे आणि त्याचं रेकॉर्ड देखील आहे. कर्नाटकातील सध्याचं भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. त्यामुळं राज्याचा विकास खुंटलाय. भाजप काँग्रेस नेत्यांना विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, डीके शिवकुमार यांना ईडीनं 3 सप्टेंबर 2019 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होतं. त्याच वर्षी 23 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT