देश

राहुल गांधींचे विश्वासू भाजपमध्ये; काँग्रेसला धक्का

नामदेव कुंभार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे उत्तर प्रदेशमधील विश्वासू जितिन प्रसाद यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी काँग्रेसला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. जितिन प्रसाद उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे विरिष्ठ नेते होते. जितिन प्रसाद मागील काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज होते, अन् भाजपसोबत त्यांनी जवळीक साधली होती. बुधवारी अखेर त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जितिन प्रसाद यांना भाजपचं सदस्यत्व दिलं. त्यानंतर जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत भेटही झाली. जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशावर पियुष गोयल म्हणाले की, 'जितिन प्रसाद मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये आपली सेवा देत आहे. वयाच्या 27 व्या वर्षांपासून जितेन प्रसाद उत्तर प्रदेशमधील जनतेच्या सेवेत आहेत. उत्तर प्रदेशमधील राजकारणात त्यांची महत्वाची आणि मोठी भूमिका आहे.'

भाजपचा झेंडा हातात घेतलेल्या जितिन प्रसाद यांनी पक्ष प्रवेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. देशहितासाठी काम करणारा नेता असल्याचं यावेळी प्रसाद यांनी सांगितलं. भाजपचं कौतुक करतानाच काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. भाजपशिवाय इतर पक्ष फक्त एखाद्या व्यक्ती अथवा प्रदेशापुरते मर्यादित राहिले आहेत, असं म्हणाले.

काँग्रेसमधील मोजक्या युवा नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचं नाव आघाडीवर होतं. जितिन प्रसाद यांना राहुल गांधींचे विश्वासू मानलं जात होतं. मागील काही दिवसांपासून प्रियंका गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसाला ट्विट करत जितिन प्रसाद यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर ट्विट डिलिट करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा सुरु होती.

पुढील काही महिन्यामध्ये देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मनीपूर आणि उत्तराखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पुन्हा इनकमिंग सुरु असल्याचं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT