Harish Rawat Demand To Sack from Congress Harish Rawat
देश

हरीश रावत यांची काँग्रेसकडे स्वतःच्या हकालपट्टीची मागणी, कारण...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : माझ्यावर पक्षाचे पद आणि तिकीटे विकण्याचा आरोप केला जात आहे. हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, सरचिटणीस आणि काँग्रेस कार्यकारीणीच्या सदस्यावर म्हणजेच माझ्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे माझा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे माझी काँग्रेस पक्षातून (Congress) हकालपट्टी करावी, अशी विनंती हरीश रावत (Harish Rawat) यांनी केली आहे.

महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी माझ्यावर तिकीट विक्री आणि पदांची विक्री केल्याचा आरोप लावला आहे. मी काँग्रेसचा मुख्यमंत्री राहिलो आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस या भूमिका निभावल्या. इतकेच नाहीतर मी काँग्रेस कार्यकारीणीचा सदस्य आहे. अशा व्यक्तीवर एका महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती आरोप करत असेल आणि अशाच पदावर बसलेल्या व्यक्तीकडून त्याचा प्रचार प्रसार होत असेल तर ते आऱोप नक्कीच गंभीर होतात. या आरोपांखाली माझी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करावी, अशी देवाला प्रार्थना करतो. होळीच्या दिवशी वाईट विचारांचं दहन केलं जाते. त्याचप्रमाणे या हरिश रावत रुपी वाईट विचारांचं काँग्रेसने दहन करावं, असे हरीश रावत म्हणाले आहेत.

हरिश रावत यांनी आपल्या ट्विटमध्ये आरोप करणाऱ्या नेत्याचे थेट नाव घेतली नाही. पण, ही आरोप करणारी व्यक्ती महत्वाच्या पदावर असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने त्यांच्यावर उत्तराखंड निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. ते काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देखील होते. याठिकाणी काँग्रेसला यश मिळेल अशी आशा होती. पण, एकूण ७० जागांपैकी काँग्रेसला फक्त १९ जागा जिंकता आल्या. इतकेच नाहीतर हरिश रावत यांचाही उत्तराखंड निवडणुकीत लालकुआ मतदारसंघातून पराभव झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT