Congress leader Jairam Ramesh esakal
देश

Congress : देशातल्या निवडणूक निकालांवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; रमेश म्हणाले, आम्हाला बहुमताची अपेक्षा..

त्रिपुरा, मेघालय (Meghalaya Assembly Election) आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात 30 वर्षांनंतर आरएसएस-भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं बाजी मारलीये.

Assembly Election 2023 : त्रिपुरा, मेघालय (Meghalaya Assembly Election) आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकाळपासून सुरू असलेली मतमोजणी शेवटच्या टप्प्यात आली आहे.

जसजशी मतमोजणी पूर्ण होत आहे, तसतसे निकालही समोर येत आहेत. तीन राज्यांतील जवळपास सर्वच जागांवरचे ट्रेंड समोर आले आहेत. यामध्ये नागालँड (Nagaland Assembly Election) आणि त्रिपुरामध्ये (Tripura Assembly Election) भारतीय जनता पक्षाला (BJP) बहुमत मिळालेलं दिसत आहे. तिथं प्रादेशिक पक्षही विजयी होताना दिसत आहेत.

दुसरीकडं, NPP मेघालयात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेसची चांगली कामगिरी दिसून येत आहे. त्याचवेळी निवडणूक निकाल जाहीर होताच विविध पक्षांची विधानंही समोर येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी पक्षासाठी हे निकाल संमिश्र असल्याचं म्हटलंय.

ईशान्येकडील तीन राज्यांसह पोटनिवडणुकांच्या निकालांबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, "आमच्यासाठी निवडणुकीचे निकाल उत्साहवर्धक आहेत, तसंच निराशाजनकही आहेत. बंगालमध्ये आमचं खातं उघडलं आहे. महाराष्ट्रात 30 वर्षांनंतर आरएसएस-भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं बाजी मारलीये.

यासोबतच जयराम रमेश म्हणाले, ईशान्येकडील राज्यांपैकी त्रिपुरामध्ये आम्हाला बहुमताची अपेक्षा होती. नागालँडमध्ये भाजप हेराफेरी करून सरकार स्थापन करेल हे आम्हाला माहीत होतं. गेल्या वेळी मेघालयात आमचे 21 आमदार होते, ते फुटले. तेथील तरुण नेत्यांना तिकीट देऊन भविष्याची काँग्रेसची तयारी केली आहे. हा निकाल स्वीकारून संघटना अधिक मजबूत करायची आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT