Congress leader Manpreet Badal resigned esakal
देश

Congress Party : भारत जोडो मधून थेट भाजप जोडो, माजी अर्थमंत्र्याचा कॉंग्रेसला राम राम

'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अधिकृतपणे राजीनामा देताना मला अत्यंत दुःख होत आहे.'

सकाळ डिजिटल टीम

बादल यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

चंदीगड : पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत बादल (Manpreet Badal) यांनी काँग्रेस पक्षाचा (Congress) राजीनामा दिला असून, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बादल यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

राहुल गांधी यांची पदयात्रा पंजाबमधून जात असताना आणि पठाणकोटमध्ये काँग्रेसची मोठी रॅली होत असताना त्यांनी हे पाऊल उचललंय. मनप्रीत बादल यांनी राहुल गांधींना पाठवलेल्या त्यांच्या राजीनाम्यात लिहिलंय, 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अधिकृतपणे राजीनामा देताना मला अत्यंत दुःख होत आहे. सात वर्षांपूर्वी मी पीपल्स पार्टी ऑफ पंजाबचं तुमच्या पक्षात विलीनीकरण केलं होतं. पंजाबमधील लोकांच्या हिताची सेवा आणि रक्षण करता येईल, अशी आशा होती. पण, तसं पक्षाकडून काहीच झालं नाही म्हणून, मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय.'

मनप्रीत बादल हा पंजाबच्या राजकारणातील मोठा चेहरा आहे. पंजाबात 2016 मध्ये काँग्रेसनं आपली जागा मजबूत करण्यासाठी प्रकाश सिंग बादल यांचे पुतणे आणि पंजाब पीपल्स पार्टीचे प्रमुख मनप्रीत बादल यांच्यासोबत सामील झालं. त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. 2011 मध्ये मनप्रीत यांनी प्रकाशसिंग बादल यांच्या शिरोमणी अकाली दल (एसएडी) पासून फारकत घेतली आणि पंजाब पीपल्स पार्टीची (Punjab People's Party) स्थापना केली. मनप्रीत 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील काँग्रेस सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 2007 ते 2010 पर्यंत प्रकाशसिंग बादल सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT