देश

Jharkhand Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् मंत्री आलमगीर आलम यांना अटक; सचिवाच्या नोकराकडे सापडले होते ३७ कोटी

आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. ते तब्बल चारवेळा या निवडून आलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे.

संतोष कानडे

ED Raid News : झारखंड सरकारमध्ये मंत्री असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम यांना ईडीने चौकशीनंतर अटक केली आहे. आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराकडे ३७ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. याच प्रकरणात त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

आलमगीर आलम हे झारखंड सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. गुरुवारी ईडीने त्यांना समन्स पाठवलं होतं.

आलम यांना १४ मे रोजी रांचीतल्या झोनल कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आलेलं होतं. ते मंगळवारी ईडीसमोर हजर झाले होते. तेव्हा त्यांची तब्बल १० तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं.

१० हजार रुपयांच्या लाचेचं प्रकरण

ईडीने मागच्याच वर्षी मे महिन्यात चिफ इंजिनिअरकडे १० हजारांच्या लाचेच्या प्रकरणात रेड टाकली होती. त्यावेळी त्यांचा जबाब नोंदवला गेला. ते म्हणाले की, मंत्र्यांकडे लाचेचा पैसा पोहोच केला जातो. त्यानंतर झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांचा पुढे आलेलं होतं. तपासणीमध्ये आलमगीर यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचंही नाव पुढे आलं. आता तर संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराकडे ३७ कोटींपेक्षा जास्त रक्कम सापडली आहे.

आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. ते तब्बल चारवेळा या निवडून आलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे. यापूर्वी ते २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ या दरम्यान झारखंड विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत.

आलमगीर यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात सरपंच पदापासून केली होती. वर्ष २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी चारवेळा बाजी मारली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप ! दुसऱ्या दिवशीही राज्यासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

Sunday Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटा अन् रव्यापासून स्वादिष्ट पुरी, लगेच नोट करा रेसिपी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : पुण्यात २२ तासांनंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह

आजचे राशिभविष्य - 7 सप्टेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT