Rahul_Gandhi 
देश

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ४ प्रश्न; कोणते ते वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना लसीबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न त्यांनी ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीबाबत भारतीयांसाठी कोणत्या कंपन्यांची निवड केली आहे आणि त्यांना निवडण्याचे कारण काय आहे हे सांगावे? असे विचारले आहे. 

दुसरे म्हणजे ही कोरोना लस सर्वप्रथम कुणाला दिली जाईल आणि या कोरोना लसीच्या वितरणासाठी सरकारने कोणती योजना तयार केली आहे? पीएम केअर्स फंडातील रक्कम कोरोना लसीसाठी वापरला जाईल का? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच १३० कोटी भारतीयांना कधीपर्यंत लसीकरण केले जाईल, असेही गांधींनी विचारले आहे. 

ब्रिटिश कंपनी अ‍ॅस्ट्रॉजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची भारतात चाचणी घेण्यात येत आहे. याबरोबरच आठ भारतीय कंपन्या कोरोना लसीच्या निर्मितीत गुंतल्या आहेत. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या आघाडीवर आहेत. भारत बायोटेकची कोवॅक्सिन 'आयसीएमआर'च्या सहकार्याने विकसित केली जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीवरून सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. तसेच ही परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार कमी पडत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्राने अनेक चुकीचे निर्णय घेतले. यामध्ये लॉकडाउनचाही समावेश आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवरूनही त्यांनी सरकारला घेरले आहे.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT