Rahul Gandhi New Puppy eSakal
देश

Rahul Gandhi New Puppy : राहुल गांधींच्या कुटुंबात नवा सदस्य; सोनियांना लागला 'नूरी'चा लळा

Sonia Gandhi Gift : राहुल गांधींनी आपल्या नव्या पेटचं नाव नूरी असं ठेवलं आहे.

Sudesh

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या आई सोनिया गांधींना एक भेट दिली आहे. त्यांनी गिफ्ट म्हणून सोनियांना जॅक रसेल टेरियर जातीचं एक कुत्र्याचं पिल्लू दिलं आहे. याचा व्हिडिओ राहुल गांधींनी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.

गोव्यावरुन आणलं कुत्र्याचं पिल्लू

राहुल गांधींच्या या व्हिडिओमध्ये दिसतंय, की ते गोवा दौऱ्यावर असतानाच कुत्र्यांच्या या पिल्लांना भेटले आहेत. राहुल त्यांच्यासोबत खेळतानाही दिसत आहेत. नंतर यातीलच एक पिल्लू घेऊन ते दिल्लीला गेले. ही आता आमच्या कुटुंबातील एक सदस्य झाल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

कुटुंबातील नवीन सदस्य

आपल्या सोबत घेऊन गेलेल्या पिल्लाचं नाव राहुल गांधींनी नूरी असं ठेवलं आहे. हे पिल्लू त्यांनी एका बास्केटमध्ये ठेऊन सोनिया गांधींना भेट म्हणून दिलं. सोनियांनी अतिशय आनंदाने नूरीला उचलून घेतलं, आणि राहुल यांना या गिफ्टसाठी धन्यवाद म्हटलं.

यानंतर या व्हिडिओमध्ये गांधी कुटुंबीयांच्या घरी नूरी खेळताना दिसत आहे. राहुल गांधींनी जागतिक पशु दिनाच्या औचित्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नूरी गोव्यातून थेट आमच्या कुशीत आली, आणि आमच्या आयुष्याचा प्रकाश झाली आहे. हा सुंदर प्राणी आपल्याला प्रामाणिकपणा आणि भरपूर प्रेम करणं शिकवतो. असं राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT