Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi : भारत जोडोनंतर काँग्रेसचा मेगा प्लॅन! देशातील १० लाख बुथपर्यंत थेट....

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - काँग्रेसची महत्त्वाकांक्षी 'भारत जोडो यात्रा' पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. समता, न्याय आणि समृद्धीभोवती विणलेला राजकीय अजेंडा घेऊन देशातील नैराश्याची भावना समाप्त करण्यासाठी निघालेला नेता म्हणून राहुल गांधी स्वत:ला सादर करण्याच्या तयारीत आहेत. भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे. त्यानंतरचा काँग्रेसचा प्लॅन ठरला आहे. (Rahul Gandhi news in Marathi)

राहुल गांधी यांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी काँग्रेसने योजना आखली आहे. त्यासाठी काँग्रेस २६ जानेवारीपासून मोहीम राबवणार आहे. ही मोहिम २६ मार्चपर्यंत चालणार आहे.

या नव्या योजनेअंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी द्वेष, बेरोजगारी, महागाई आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित इतर प्रश्नांबाबत पत्र लिहिले आहे. २६ जानेवारीपासून काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी त्यांचा हा संदेश पोहोचवणार आहेत. या पत्रात राहुल यांनी स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण विश्वासार्ह पर्याय असल्याचं म्हटलं आहे. भारतातील सहा लाख गावांतील १० लाख बुथपर्यंत राहूल गांधींचा संदेश पोहोचवण्याची योजना आहे.

राहुल गांधी यांच्या पत्राची सुरुवात 'आपका अपना राहुल' या शब्दाने होते. 'माझा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास एकच आहे, आवाज नसलेल्यांना आवाज देणे, दुर्बलांचे शस्त्र बनणे, भारताला अंधारातून प्रकाशाकडे, द्वेषातून प्रेमाकडे, दु:खातून समृद्धीकडे घेऊन जाणे,' असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. ज्यांनी आम्हाला आमचे असाधारण संविधान दिले आहे, त्यांची दृष्टी आणि मूल्ये मी पुढे नेईन. "

भारत जोडो हा माझ्या आयुष्यातील सर्वात समृद्ध प्रवास होता, असे गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. प्रत्येक भारतीयाने आम्हाला दिलेले प्रेम आणि आपुलकी पाहून मी भारावून गेलो आहे. या प्रवासात मी तुमचे सगळे किस्से लक्षपूर्वक ऐकत होतो.

पत्रातील आव्हानांचे वर्णन करताना राहुल यांनी लिहिले की, "देशात स्पष्ट आर्थिक संकट निर्माण होत आहे. तरुणांमध्ये बेरोजगारी, महागाई, शेतीचे गंभीर संकट आहे. लोकांना नोकऱ्या जाण्याची भीती सतावत आहे. लोकांचे उत्पन्न कमी होत आहे. चांगल्या भविष्याची त्यांची स्वप्ने मोडीत निघत आहेत. देशभरात तीव्र नैराश्याची भावना आहे. "

आज आपली बहुविधता धोक्यात आली आहे. फुटीरतावादी शक्ती आपल्या विविधतेला आपल्याविरोधात वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळे धर्म, समुदाय, प्रदेश एकमेकांच्या विरोधात उभे केले जात आहेत. संख्येने मूठभर असलेल्या या शक्तींना माहित आहे की जेव्हा लोकांना असुरक्षित आणि भीती वाटेल तेव्हाच ते एकमेकांबद्दल द्वेषाची बीजे रोवू शकतील. पण भारत जोडो भेटीनंतर मला असे वाटू लागले की, या दुष्ट अजेंडय़ाला मर्यादा आहेत आणि ते यापुढे चालू शकत नाही. "

या पत्राच्या शेवटच्या परिच्छेदात राहुल यांनी जनतेकडून काँग्रेसला पाठिंबा मागितला आहे. आधी स्वातंत्र्य, मग एकजूट आणि मग या देशाच्या उभारणीसाठी काँग्रेस कुटुंब १३७ वर्षांपासून अथक प्रयत्न करत आहे. कठीण काळात आम्ही नेहमीच देशाला एकत्र आणले आहे. आज पुन्हा आपला देश संकटात सापडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT