Rahul Gandhi in Kalaburagi Karnataka esakal
देश

Karnataka Election : भरपावसात भिजत राहुल गांधींनी ठोकलं जबरदस्त भाषण; काँग्रेसला मिळणार 'इतक्या' जागा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून (शुक्रवार) कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत.

Balkrishna Madhale

महाराष्ट्रातील साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही भरपावसात भिजत जनतेला संबोधित केलं होतं.

Rahul Gandhi in Kalaburagi Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून (शुक्रवार) कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, राज्यात आज काही ठिकाणी झालेल्या पावसामुळं त्यांचे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.

मात्र, कलबुर्गीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) भरपावसात भिजत स्टेजवर पोहोचले आणि त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी मंचावरून त्यांनी कर्नाटकात काँग्रेसचं (Congress) बहुमताचं सरकार स्थापन होईल, असा दावा केला. भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, 'कर्नाटकची जनता यावेळी भापला फक्त 40 जागा देईल.'

कलबुर्गीत राहुल गांधींनी भरपावसात भिजून जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले, आम्ही कर्नाटक निवडणूक जिंकू आणि इथं सरकार स्थापन करू. यावेळी राज्यात काँग्रेसला सरकार (Congress Government) बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राज्यात भाजपला सर्वाधिक 40 जागा मिळतील तर, काँग्रेसला किमान 150 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.

Rahul Gandhi in Kalaburagi Karnataka

दरम्यान, महाराष्ट्रातील साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही भरपावसात भिजत जनतेला संबोधित केलं होतं आणि इथं राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक आले होते. हीच किमया राहुल गांधी साधणार का? अशी चर्चा सुरु आहे.

Rahul Gandhi in Kalaburagi Karnataka

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT