Sachin Pilot VS Ashok Gehlot Government esakal
देश

Sachin Pilot: नाव भाजपचं पण खरं लक्ष्य काँग्रेस, सचिन पायलटांच्या उपोषणामागं काय घडतंय?

Sachin Pilot: राजस्थानात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Rajasthan Assembly Election) काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस सुरू झालीये.

Balkrishna Madhale

राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर रंधावा यांनी सचिन पायलट यांच्याशी फोनवर चर्चा केली असून त्यांनी पक्षाच्या मंचावर आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय.

राजस्थानात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Rajasthan Assembly Election) काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस सुरू झालीये, त्यामुळं पक्षातील अंतर्गत वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आलाय.

2018 च्या विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यावर नाराज असलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पुन्‍हा आक्रमक भूमिका घेतली आहे. जयपूरमधील हुतात्मा स्मारकावर पायलट (Sachin Pilot) यांनी लाक्षणिक उपोषण सुरु केलंय.

मात्र, पायलट यांच्या उपोषणावर काँग्रेसनं टीका केली आहे. राजस्थानचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी पायलट यांना पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप केलाय. दरम्यान, सचिन पायलट यांनी आज (मंगळवार) जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर उपोषणाला सुरूवात केली.

व्यासपीठावर गांधीजींचा फोटो लावण्यात आला असून राष्ट्रपितांचं आवडतं भजन ‘वैष्णव जन तो…’ वाजवले जात आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी पायलट यांनी ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली.

तसंच वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचारावर कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आज सायंकाळी 5 नंतर ते माध्यमांशी बोलणार असल्याचं कळतंय.

राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर रंधावा यांनी सचिन पायलट यांच्याशी फोनवर चर्चा केली असून त्यांनी पक्षाच्या मंचावर आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय. तसंच दिल्लीतील पक्ष नेतृत्वानंही यावर विचारमंथन सुरू केलं आहे.

निवडणुकीपूर्वी गेहलोत यांच्या विरोधात नवी आघाडी उघडत पायलट हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. पायलट यांनी यापूर्वीही त्यांच्याच सरकारविरोधात बंड केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT