congress latest political news 
देश

राहुल गांधी चौकशीच्या फेऱ्यात; सचिन पायलट पोलिसांच्या ताब्यात

ईडीने आज सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी केल्याने देशभरातील वातावरण चांगलचं तापलंय

सकाळ डिजिटल टीम

ईडीने आज सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी केल्याने देशभरातील वातावरण चांगलचं तापलंय

नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कॉंग्रसेचे राहुल गांधी यांना ईडीनं काही दिवसांपूर्वीच समन्स बजावलं होतं. आज तिसऱ्या दिवशीही त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, राहुल गांधींची चौकशी सुडभावनेतून केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत आंदोलन छेडलं आहे. देशभरात पक्षातील विविध नेते याविरोधात निदर्शने करत असून आता राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (congress latest political news)

मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आता सचिन पायलट यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांना ईडी मुख्यालया बाहेरून ताब्यात घेण्यात आले असून कार्यकर्त्यांनी यावेळी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. एएनआयने ट्विट केलेल्या एका व्हिडिओत अनेक कार्यकर्त्यांना ओढून गाडीत बसवत असल्याचे चित्र दिसत आहे.

राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीला विरोध करणारे काँग्रेस नेते अजय कुमार लल्लू यांच्यासह कार्यकर्त्यांना दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने आज सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी केली आहे. आतापर्यंत राहुल गांधी यांच्यासोबत 21 तास प्रश्नोत्तरांची चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुख्यालयात जाण्यापासून रोखून भाजप सरकारने राजकीय हालचाली थांबवल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

कॉंग्रसे नेते हे देशातील शेतकरी, जवान आणि मजुरांसाठी आवाज उठवत असल्याने सूडाने त्यांच्यावर ही कारवाई केली असल्याचा आरोप कॉंग्रसेने केला आहे. त्यामुळे ईडीचा गैरवापर करुन भाजप राहुल गांधींना टार्गेट करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT