sanjay gandhi.
sanjay gandhi. 
देश

sanjay gandhi: संजय गांधींना नेते-कार्यकर्ते का घाबरायचे?

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 14 डिसेंबर 1946 हा माजी काँग्रेस नेते संजय गांधी यांचा जन्मदिवस. काँग्रेस किंवा गांधी कुटुंबातील सदस्य संजय गांधी यांचे नाव फारसे घेताना दिसत नाहीत. संजय गांधी यांची इतिहासातील भूमिका एखाद्या पाण्यावरील बुडबुड्या प्रमाणे आहे. जो लवकरच विरुन गेला. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधी यांनी कोणत्याही भाषणात त्यांचा चुकुनही उल्लेख केलेला नाही. 

संजय गांधी फटकळ आणि सुस्पष्ट होते. वयाने मोठे असणाऱ्यांना ते आदराने बोलायचे नाहीत. त्यांना जे वाटायचं ते सरळ तोंडावर बोलायचे. अनेक लोक त्यांना सर म्हणून बोलवायचे. कुटुंब नियोजन हे गरिबी हटवण्यासाठी आवश्यक असल्याचं त्यांना वाटायचं, पंचसूत्री कार्यक्रम देशाच्या कल्याणासाठी होते हे काही काळाने देशवासीयांनीही स्वीकारलं. संजय गांधी यांची प्रतिमा 'मॅन ऑफ अॅक्शन' अशी होती, पण त्यांच्यात संयमाची कमतरता होती. संजय गांधी यांना कशाचंही व्यसन नव्हतं. ते चहा सुद्धा प्यायचे नाहीत. ते अगदी कमी शब्दात आपलं मत व्यक्त करायचे.

53 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडे येणार

नसबंदी कार्यक्रमामुळे संजय गांधींची प्रतिमा खालावली

1975 मध्ये आणीबाणीच्या दरम्यान नागरिकांच्या अधिकारांवर बंधनं आणण्यात आली होती. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात जे निर्णय घेतले, त्यातील वादग्रस्त ठरला तो नसबंदीचा निर्णय. संजय गांधी यांनी या अभियानाची मागच्या दरवाजाने धुरा संभाळली होती. संजय गांधींनी नसबंदीचे अभियान यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट दिले होते. जे अधिकारी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करणार नाहीत, त्यांचे वेतन कपात केली जाईल अशी ताकीद होती. त्यांना कोणी 'काम झालं नाही' असं म्हटलेलं चालायचं नाही. शिवाय तुमचं चुकतय असं त्यांना जाऊन सांगण्याचीही कुणाच्यात हिंमत नव्हती.

नसबंदीच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही परिस्थितीत ध्येय गाठण्याची अधिकाऱ्यांना सक्ती करण्यात आली होती. सर्व कार्यकर्ते आणि अधिकारी संजय यांना खूप घाबरत असत. त्यांच्याकडे संयमाचा अभाव होता. पण, ते वेळेचे काटेकोरपणे पालन करायचे आणि दुसऱ्यांनीही ते करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांना भेटायला घेणाऱ्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळाही अगदी निश्चित असायच्या.

संजय गांधी यांच्याकडे कोणतेही पद किंवा अधिकार नव्हते. तरीही ते देशाचे सर्वोच्च नेते असल्यासारखं वर्तन करायचे. आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षनेत्यांना अटक करण्याचा आदेश देणे, आक्रमकपणे आणीबाणीची अंमलबजावणी करणे असं अनेक आरोप त्यांच्यावर होते. काहींच्या म्हणण्यानुसार इंदिरा गांधी यांच्यापेक्षा संजय गांधी काँग्रेसमधील मोठे नेते ठरत होते. त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा.

चीनच्या लशीचे गंभीर परिणाम; पेरु सरकारने दिली ट्रायलला स्थगिती

इंद्रकुमार गुजराल यांच्यासोबत संजय गांधींचं बिनसलं होतं

प्रसारित करण्यापूर्वी आकाशवाणीचं समाचार बुलेटिन आपल्याला दाखवावं, असा आदेश संजय गांधी यांनी दिला होता. इंद्रकुमार गुजराल यांनी यास नकार दिला. त्याच्या पुढच्याच दिवशी ''तुम्ही तुमचं खातं व्यवस्थितपणे सांभाळत नाही आहात'' असं संजय गांधींनी गुजराल यांना म्हटलं होतं. त्यावेळी गुजराल यांचं प्रत्युत्तर होतं, तुला माझ्याशी सभ्य भाषेत बोलावं लागेल, माझं आणि पंतप्रधानांचं नातं तेव्हापासूनच आहे जेव्हा तुझा जन्मसुद्धा झाला नव्हता''.  त्यानंतर गुजराल यांना पदावरुन काढून टाकण्यात आलं होतं. 

वेगाचं वेड

संजय गांधी यांना वेगाचं वेड होतं असं म्हटलं तरी चालेल. त्यांना वेगाने कार चालवायची आवड होती. विमान चालवताना वेग-वेगळ्या कसरती करण्याचा त्यांना छंद होती. 23 जून 1980 च्या दिवशी ते विमानात बसून कसरती करते होते. त्यांनी सुरक्षा नियमांचं उल्लंघन करत रहिवासी भागावर तीन फेऱ्या मारल्या, पण चौथी फेरी मारण्याआधीच त्यांचे पिट्स विमान जमिनीवर आदळलं. विमानाचं इंजिन बंद पडले असल्याने हा अपघात झाला होता. संजय गांधी यांचा मृतदेह विमानाच्या मलब्यापासून चार फुटाच्या अंतरावर पडला होता, असं सांगितलं जातं.

(edited by- kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT