Sonia Gandhi Retirement SAKAL
देश

Sonia Gandhi Retirement : राजीव गांधींना राजकारणात येऊ नका म्हणणाऱ्या सोनिया गांधी स्वत: पॉलिटिक्समध्ये कशा आल्या?

असं काय झालं की राजीव गांधींसह सोनिया गांधींनांही राजकारणात यावं लागलं. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Sonia Gandhi Retirement : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचं 85 वं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अधिवेशनात संबोधित करताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोठं विधान केलंय.

आपली राजकीय कारकिर्द संपत आल्याचे संकेत सोनिया गांधीने दिले. या दरम्यान त्या म्हणाल्या, "काँग्रेसची भारत जोडो यात्रा माझ्या राजकीय खेळीचा शेवटचा मुक्काम असू शकतो." त्यांच्या या विधानाने त्या राजकारणातून लवकरच सन्यास घेतील का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

सोनिया गांधींची राजकीय कारकिर्द पाहली तर त्यांना कधीच राजकारणात यायचे नव्हते. एवढंच काय तर त्या पती राजीव गांधींनांही राजकारणात जाऊ नका, अशा सातत्याने म्हणायच्या पण मग असं काय झालं की राजीव गांधींसह सोनिया गांधींनांही राजकारणात यावं लागलं. आज आपण त्या विषयीच घेणार आहोत. (congress leader sonia gandhi likely to declare Retirement from politics told in speech raipur chhattisgarh )

सोनिया गांधी आणि राजीव गांधी लव्हस्टोरी

तुम्हाला राजीव गांधीं आणि सोनिया गांधी यांची लव्हस्टोरी माहिती असेलच. इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी यांची राजीव गांधीशी केंब्रिजला पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांमध्ये मैत्री मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. राजीव गांधी पत्राद्वारे सोनिया यांच्याविषयी इंदिरा गांधी यांना सांगायचे.

जेव्हा इंदिरा गांधींसोबत सोनिया यांची पहिली भेट झाली तेव्हा त्या भेटीदरम्यान सोनिया या खूप घाबरल्या होत्या. इंदिराजींनी भेटीत सोनियांना खूप रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला. सोनिया यांनी माहिती होतं की राजीव गांधी यांचं राजकीय घराणं आहे पण सोनिया गांधींना राजीव गांधींनी कधीच राजकारणात जाऊ नये, असं वाटायचं अनेकदा लग्नाच्या आधीही त्यांनी हे बोलून दाखवलं.

लग्नानंतरचा काळ

२५ फेब्रुवारी, १९६८ रोजी सोनिया गांधी आणि राजीव गांधी लग्नबंधनात अडकले. राजीव गांधी यांना नेहमी पायलट बनण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी एअर इंडियामध्ये पायलट म्हणून नोकरी करायचे

जेव्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या तेव्हा सुद्धा ते पायलटमध्ये नोकरी करायचे. त्यावेळी इंदिरा गांधींसोबत त्यांचा भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. पण संजय गांधींचा १९८० विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजीव गांधीला राजकारणात यावं लागलं. त्यावेळीही सोनिया गांधींनी राजीव गांधींना राजकारणात जाऊ नका असे सांगितले. पुढे ३१ ऑक्टोबर, १९८४मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाचा सर्व भार आणि सुत्र राजीव गांधींकडे आली.

सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील वाईट काळ

सोनिया आणि राजीव गांधी यांच्या आयुष्यातील सुरवातीचे १३ वर्षे राजकीय चढ उतारात गेले. कारण कुटूंबात एकानंतर एक दु:खद घटना घडत होत्या. सुरवातीला संजय गांधींचा अपघाती मृत्यू त्यानंतर इंदिरा गांधीची हत्या. या दु:खातून सावरत असतानाच इंदिरा गांधीच्या हत्येनंतर सात वर्षांनी म्हणजेच १९९१ मध्ये राजीव गांधींची सुद्धा हत्या झाली.

इटलीमधून आलेल्या सोनिया गांधींसाठी हे हत्येचं सत्र न असहनीय होतं. इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतरही त्यांनी कित्येकदा राजीव गांधींना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. राजीव गांधीच्या मृत्यूनंतर त्या पुर्णत: कोलमडून गेल्या होत्या.

सोनिया गांधी यांची राजकीय कारकिर्द

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कॉंग्रेस दिवसेंदिवस मागं येत होतं. कॉंग्रेसला एका चांगल्या नेतृत्वाची गरज होती. यामुळे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ७ वर्षांनी १९९८ साली सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. २०१७ सालापर्यंत २२ वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर पुढे २०१९ साली राहुल गांधींनी, राजीनामा दिल्यानंतर त्या परत अध्यक्ष बनल्या.

या त्यांच्या राजकीय कारकिर्दीदरम्यान त्यांच्या परदेशातील जन्माच्या मुद्द्यावरून त्यांना नेहमी टीकेला सामोरे जावे लागले. पण त्या डगमगता उभ्या राहल्या. त्या अनेक सल्लागार समितींच्या अध्यक्षस्थानी होत्या. एवढंच काय तर अनेकदा सोनिया गांधींचा  जगातील सर्वात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये समावेश करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या वनडे अन् टी२० संघाची घोषणा! विलियम्सन दुखपतीमुळे नाही, तर 'या' कारणामुळे खेळणार नाही

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’ प्रसिद्ध व्हिडिओ गेम निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

INDW vs SLW, 2nd T20I: ११ चौकार, १ षटकार अन् नाबाद अर्धशतक... शफाली वर्माची बॅट तळपली! भारताचा सलग दुसरा विजय

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

SCROLL FOR NEXT