Lok Sabha Election Exit Poll 2024 Esakal
देश

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll 2024: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जनतेच्या एक्झिट पोलमध्ये विरोधी आघाडी इंडियाचे सरकार बनत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर येत आहेत. निवडणुकीसंदर्भातील एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, हे एक्झिट पोल जनतेचे नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत.

सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं की, "सरकारी एक्झिट पोल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्झिट पोल आहे. जनतेच्या एक्झिट पोलनुसार विरोधी इंडिया आघाडीला २९५ जागा मिळत आहेत. यातली एकही जागा कमी होणार नाही. आम्हाला याचा अंदाज आहे.

एबीपीचे एक्झिट पोलनुसार कोणला किती जागा मिळाल्या?

एबीपी-सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १७५ ते २०७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला ९४ ते ११७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर अपक्ष १ ते ७ जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची मंगळवारी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

रिपब्लिक MPARQ च्या एक्झिट पोलनुसार देशभरात एनडीए आघाडीला 353 ते 368 जागांवर आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला केवळ 118 ते 133 जागांवर आघाडी मिळणार असल्याचा अंदाज दिसून येते. तसेच, इतरमध्ये 43 ते 48 जागांचा अंदाज आहे.

रिपब्लिक Matriz च्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीए आघाडीला 359 जागांवर आघाडी आहे. तर, इंडिया आघाडीला 154 जागांवर आघाडी मिळू शकते. इतरमध्ये 30 जागा दर्शवण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon :खडसेंच्या घरात चोरी! ५ तोळं सोनं आणि ३५ हजार लंपास; एकनाथ खडसे म्हणाले, जळगावात पोलिसांचा धाक राहिला नाही

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरामध्ये कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; फसवणुकीचा मोठा गोरखधंदा उघडकीस

Ranji Trophy 2025: पावसाच्या व्यत्ययात मुंबई संघाची कसरत; छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात आघाडीसाठी आता चार विकेटची गरज

UP Encounter: योगींच्या पोलिसांनी एका शहरात केले डबल एनकाऊंटर! तिघांच्या पायाला गोळी; गुन्हेगारीचा मोठा इतिहास!

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

SCROLL FOR NEXT