देश

कर्नाटकातील काँग्रेस नेते दिल्लीत

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून कर्नाटकातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील काँग्रेस-धजद युतीत निर्माण झालेल्या तणावावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव, माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडीवर राहुल गांधी त्यांच्याशी ते चर्चा करतील. २३ मे रोजी लागणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीबद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. कर्नाटकातील २८ लोकसभा व दोन विधानसभांच्या पोटनिवडणूक निकालाचा राज्यातील युती सरकारवर होणाऱ्या परिणामाची बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.

धजद नेत्यांनी सिध्दरामय्या यांच्याविरुध्द केलेले आरोप व व्यक्त केलेली नाराजी यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. प्रामुख्याने धजदच्या प्रदेशाध्यक्षांनी सिध्दरामय्या यांच्याविरुध्द वक्तव्य करून नाराजी व्यक्त केली आहे. 
काही आमदारांनी सिध्दरामय्या मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी केल्याने दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर धजदचे नेते बसवराज होरट्टी यांनी सरकारचे विसर्जन करणेच योग्य असल्याचे म्हटले आहे. या सर्व गोष्टीवर चर्चा करून युतीच्या वाटचालीवर काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT