Karnataka Assembly Election Results Esakal
देश

Karnataka Assembly Election Results 2023 : पहिल्या पंधराच मिनिटांत काँग्रेस 100 जागांनी आघाडीवर; भाजप पिछाडीवर

कर्नाटकमधील निवडणुकीचे पहिले 183 जागांचे कल हाती आले

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.

कर्नाटकमधील निवडणुकीचे पहिले 183 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस 100 जागांनी आघाडीवर आले आहेत. तर भाजप 68वर तर जेडीएस 12 जागांवर आहे. कल सातत्यानं बदलत आहेत.

आजचा दिवस काँग्रेस आणि भाजपसाठी खूप महत्वाचा असणार आहे. कर्नाटकच्या जनतेने कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकला ते स्पष्ट होत आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील.

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तसेच केंद्रीय मंत्र्यांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनतेने कोणाची निवड केली हे दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

SCROLL FOR NEXT