Mallikarjun Kharge 
देश

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Mallikarjun Kharge photo blacked out: मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

कार्तिक पुजारी

कोलकाता- काँग्रेसमध्ये धुसफूस निर्माण झाल्याचं दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेग यांच्या फोटोवर पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये काळी शाई लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर कोलकातामधील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवरील खरगे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे. काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक बॅनर आहेत. त्यावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे देखील फोटो आहेत. पण, खरगे यांच्याच फोटोवर काळी शाई लावण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक ऐन भरात असताना काँग्रेसमधील ही अंतर्गत धुसफूस पक्षाची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. खरगे यांच्या फोटोला काळी शाई लावण्यात आल्याचं समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे बॅनर काँग्रेस कार्यालयाबाहेरुन हटवले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणत्याही नेत्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 'आज तक'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दोन नेत्यांमधील वादाचं कारण काय?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतील सहभागाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, इंडिया आघाडीचे सरकार बनल्यानंतर त्या बाहेरुन पाठिंबा देतील. त्यांच्या या वक्तव्यावर अधीर रंजन चौधरी यांनी शंका उपस्थित केली होती. ममता बॅनर्जी यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, असं ते म्हणाले होते.

मल्लिकार्जुन खरगे यांना याबाबत विचारण्यात आलं होतं. ते म्हणाले होते की, 'ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीसोबत आहेत. त्यांनी नुकतंच म्हटलंय की त्या सरकारमध्ये सहभागी होतील. अधीर रंजन चौधरी निर्णय घेणार नाहीत. निर्णय मी आणि हायकमांड घेईल. ज्यांची सहमती नसेल ते बाहेर जातील.' खरगे यांच्या वक्तव्यामुळे पश्चिम बंगालमधील कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज, १० जिल्ह्यांना अलर्ट; विजांसह वादळी पावसाचा इशारा

UP Career Guidance: IAS-IPS अधिकारी आता थेट शाळेत; १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरचे धडे देणार योगी सरकार

India Justice Access Reforms: न्यायालयापर्यंत पोहोचणे सोपे करा; CJI सूर्यकांत यांचा विधी सेवा यंत्रणेला संदेश, मुख्यमंत्र्यांना आठवल्या अहिल्यादेवी

Sangli Crime : सोनी-पाटगावमध्ये सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून; मिरज तालुका हादरला, सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण

आजचे राशिभविष्य - 09 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT