rahul gandhi priyanka gandhi 
देश

राहुल गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला तर प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्या राष्ट्रपती भवनावरील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतरही मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मोदी सरकार त्यांच्या हट्टावर कायम आहे. जो कोणी सरकारला प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही ठरवलं जात आहे. सरकारच्या नजरेत शेतकऱ्यांसाठी कोणताच आदर नसल्याचंही प्रियांका गांधी म्हणाल्या. 

राहुल गांधी यांच्यासह तीन नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. काँग्रेसला राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही मोर्चा काढल्यानंतर प्रियांका गांधींसह काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यत घेतलं. दरम्यान, त्याआधी काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आणि राष्ट्रपती भवनाजवळची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी म्हटलं की, भारताचे शेतकरी त्रासापासून वाचण्यासाठी कृषी विरोधी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आपण सर्वांनी देशाच्या अन्नदात्यांना साथ द्यायला हवी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT