Congress Meeting 
देश

नेते म्हणतात प्रदेशाध्यक्ष बदला अन् पटोले म्हणतात प्रभारी बदला! राहुल गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसला दिला खास सल्ला

Sandip Kapde

नवी दिल्ली : काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे. कर्नाटकच्या धर्तीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना संपूर्ण एकजुटीने निवडणुकीत उतरण्याचा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाने मंगळवारी राज्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील २५ नेते सहभागी झाले होते.

काँग्रेस नेत्यांची बैठक ४ ते ५ तास चालली. एच के पाटील मंत्री झाल्यानंतर आता राज्यात नवा प्रभारी दिला जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रभारी एच के पाटील यांच्या कामावर नाराज आहेत. नवीन प्रभारी देताना भांडण न लावणारा आणि सगळ्या जिल्ह्यात फिरणारा द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे केली.

तसेच वरिष्ठांनी देखील नाना पटोले यांनी काही सल्ले दिले आहेत. नाना पटोले यांनी नेत्यांच्या मतदारसंघात जाताना स्थानिक नेत्यांशी संपर्क साधावा. तिथं कुठलाही वाद होणार नाही याची काळजी पटोले यांनी घ्यावी.

विजय वड्डेट्टीवार यांना खर्गे यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला. तसेच आमदार वर्षा गायकवाड या बैठकीत शेवटी बोलल्या म्हणून राहुल गांधी नाराज झाले होते. महिलांना बोलायला अगोदर संधी द्यायला हवी अशी सक्त ताकीद राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली.

राहुल गांधी यांनी सर्व नेत्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना न दुखवता राज्यात काम करण्याचा संदेश दिला आहे. आगामी काळात राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहील. कर्नाटक विजयानंतर राज्यात देखील आपण जिंकू शकतो ही खात्री आपल्याला आली आहे, त्यामुळं थेट लोकांशी संपर्क वाढवा, असे राहुल गांधी यांनी नेत्यांना सांगितले. साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं अस मतं काही नेत्यांनी बैठकीत मांडलं. कारण 2019 ला वंचितमुळे मोठा फटका बसला होता. तो पुन्हा बसू नये यासाठी ते (प्रकाश आंबेडकर) सोबत आले तर फायदा होऊ शकतो, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP चं आंदोलन थेट लंडनमध्ये! ध्रुव राठी मैदानात, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काय आहे प्लॅन?

Nagpur Flight Fares: मुंबई-नागपूरचे प्रवास भाडे २२ हजार पार;दिवाळीत प्रवाशांना ‘फटाका’; विमान कंपन्यांकडून विक्रमी वाढ

Pune Teachers Constituency : भाजपच्या वाट्याची जागा अन् शिंदेंची चाल; पुणे निवडणुकीत उफाळली महायुतीमधील धुसफूस, सचिन सानप शिवसेना पुरस्कृत उमेदवार

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' निवडणुकीसाठी आजपासून जाहीर प्रचार बंद; उद्या मतदान

वकील सासऱ्यांची घेतली मदत, आता कोर्टात लढणार केस! शिवानी रांगोळेच्या 'कोण यशवंत पानसरे?' वेब सीरिजची चर्चा

SCROLL FOR NEXT