Flying kiss Controversy Esakal
देश

Flying Kiss Controversy:फ्लाईंग किसचा विषय काढत लक्ष विचलीत करायचा प्रयत्न ? कॉंग्रेसकडून स्मृती इराणींवर पलटवार

मुख्य विषयापासून भरकटवलं जातंय, फ्लाईंग किस मुद्द्यावर कॉंग्रेस खासदाराची प्रतिक्रिया.

सकाळ डिजिटल टीम

Congress Replied on allegations: राहुल गांधी यांनी बुधवारी (दि.९ ऑगस्ट)संसदेत भाषण केले. भाषण संपल्यावर त्यांनी अभद्र देहबोलीचा वापर केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लावला. त्या म्हणाल्या की राहुल गांधींनी फ्लाईंग किस करत संसदेचा आणि संसदेतल्या महिला खासदारांचा अपमान केलाय.

आता यावर कॉंग्रेसच्या नेत्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कॉंग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी स्मृती इराणींनी राहुल गांधीवर केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्मृती इराणींनी राहुल गांधींवर जो गैरवर्तानाचा आरोप लावला होता, यावर कार्ती चिदंबरम म्हणाले की ते भारतीय जनता पक्षाच्या विषयांतर करण्याच्या पद्धतीशी मीअवगत नाहीये. भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या भाषणातील महत्वाच्या भागावरुन लक्ष विचलीत करण्याचा दुर्भाग्यपूर्ण प्रयत्न करत आहेत.

राहुल गांधींनी खासदारकी बहाल झाल्यावर लोकसभेत पहिल्यांदा भाषण केले. त्यावेळी त्यांनी मणिपुरच्या महिलांची व्यथा मांडली. राहुल गांधी जेव्हा मणिपुरमध्ये घडलेल्या घटनांबद्दल बोलत होते, तेव्हा सत्ताधारी पक्षांच्या खासदारांकडून राजस्थानमधील घटनेवर बोलण्याचा आग्रह करण्यात आला.

भाषण संपल्यावर सदनातून बाहेर जाताना त्यांनी फ्लाईंग किस देऊन लोकसभेचा आणि सभागृहातील महिला खासदारांसमोर गैरव्यवहार केला, असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT