Congress MP Rahul Gandhi unfurls the national flag at Lal Chowk in Srinagar esakal
देश

ऐतिहासिक क्षण! पंतप्रधान नेहरूंनंतर लाल चौकात राहुल गांधींनी फडकवला 'तिरंगा'

काँग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये

रुपेश नामदास

काँग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधींनी तिरंगा फडकवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या.

यावेळी राष्ट्रगीत गात राहुल गांधी यांनी ध्वजारोहण केले. यानंतर श्यामलाल गुप्ता यांची प्रसिद्ध गीत, विजय विश्व तिरंगा प्यारा हे गायले. काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली होती.

आता ती जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. आज कडक बंदोबस्तात राहुल गांधी यांनी लाल चौकात ध्वजारोहण केले. राहुल श्रीनगरमधूनच आज 5.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

पांढरा टी-शर्ट परिधान करून, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सकाळी 11.45 वाजता पुन्हा पदयात्रेला सुरुवात केली.

यादरम्यान हजारो काँग्रेस समर्थक राष्ट्रध्वज आणि काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन राहुल आणि प्रियंका यांच्यासोबत रॅलीमध्ये चालताना दिसले.

1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावला होता. पंडित नेहरूंनंतर लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत.

तिरंगा फडकवताना राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. दरम्यान, राहुल आणि प्रियांकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस-प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

SCROLL FOR NEXT